WAR Box Office Collection Day 7: हृतिक-टायगरच्या वॉर सिनेमानं रचला इतिहास, 7 दिवसात कमावले इतके कोटी

बी टाऊन
पूजा विचारे
Updated Oct 09, 2019 | 16:12 IST

WAR Box Office Collection Day 7: हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या वॉरनं कमाईच्या बाबतीत नवीन रेकॉर्ड रचला आहे. या सिनेमानं एका झटक्यात सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार आणि शाहिद कपूरचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

War Poster
WAR Box Office Collection Day 7: हृतिक-टायगरच्या वॉर सिनेमानं रचला इतिहास, 7 दिवसात कमावले इतके कोटी 

थोडं पण कामाचं

  • वॉर सिनेमानं रिलीजच्या सातव्या दिवशी 200 कोटींच्या क्लबमध्ये आपली जागा बनवली आहे.
  • हा सिनेमा 2019 चा सर्वांत वेगानं 200 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ठ होणारा सिनेमा बनला आहे.
  • एका झटक्यात सुपरस्टार सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार आणि शाहिद कपूर यांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. 

WAR Box Office Collection Day 7: बॉलिवूडचा अॅक्शन स्टार हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफचा सिनेमा वॉरनं कमाईच्या बाबतीत असा रेकॉर्ड केलेत जे सहज कुणीही ब्रेक करू शकत नाही. वॉर सिनेमानं रिलीजच्या सातव्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी एका झटक्यात सुपरस्टार सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार आणि शाहिद कपूर यांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. 

या सिनेमानं रिलीजच्या सातव्या दिवशी 200 कोटींच्या क्लबमध्ये आपली जागा बनवली आहे. यासोबतच हा सिनेमा 2019 चा सर्वांत वेगानं 200 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ठ होणारा सिनेमा बनला आहे. फिल्म समीक्षक आणि ट्रेड एनालिस्ट रमेश बाला यांच्यानुसार दसऱ्याच्या दिवशी सिनेमानं 7 कोटी रूपये कमावले. या हिशोबानुसार, या सिनेमाची एकूण कमाई 215 कोटी रूपयांवर पोहोचली आहे. 

2019 मध्ये रिलीज झालेल्या सिनेमांबद्दल बोलायचं झाल्यास, शाहिद कपूरचा सुपरहिट सिनेमा कबीर सिंहनं 13 दिवसात 200 कोटींच्या क्लबमध्ये आपली जागा बनवली होती. तर सलमान खानचा भारत सिनेमा 14 व्या दिवशी 200 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ठ झाला. विकी कौशलचा उरी 28 व्या दिवशी आणि अक्षय कुमारचा मिशन मंगल 29 व्या दिवशी 200 कोटींच्या क्लबमध्ये समावेश झाला. 

जर का आतापर्यंत रिलीज झालेल्या हिंदी सिनेमाबद्दल बोलायचं झाल्यास, सात दिवसांआधी कोणताही हिंदी सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ठ होऊ शकला नाही आहे. 7 दिवसामध्ये हा रेकॉर्ड करणाऱ्या सिनेमामध्ये वॉर, संजू, टायगर जिंदा है आणि सुल्तान या सिनेमांचा समावेश आहे. तर दंगल आणि पीकेनं हा रेकॉर्ड आठव्या दिवशी केला. बजरंगी भाईजान या सिनेमाला 200 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ठ होण्याासाठी 9 दिवस लागले होते. 

अॅक्शन आणि स्टंटला पसंती 

स्टंट, शानदार अॅक्शननी भरलेल्या या सिनेमातील डायलॉग देखील खूप प्रभावी आहे. डायरेक्टर सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा लोकांना खूप भावला. सिनेमातील अशा काही सिन्सवर फॅन्सनी शिट्ट्या मारल्या, टाळ्या वाजवल्या. हा सिनेमा पूर्णपणे एक मसाला फिल्म आहे. ज्यात हृतिक आणि टायगरचं युद्ध आहे. 2 ऑक्टोबर 2019 ला रिलीज झालेला वॉर या सिनेमात हृतिक आणि टायगर यांच्या व्यतिरिक्त वाणी कपूर, आशुतोष राणा, अनुप्रिया गोयंका, दीपानिता शर्मा यांची महत्त्वाची भूमिका आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी