‘आमच्या दोघांमध्ये सगळं ठीक होतं पण...’ अरबाज घटस्फोटाबद्दल म्हणाला

बी टाऊन
Updated Apr 19, 2019 | 15:21 IST | टाइम्स नाऊ हिंदी

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान मलायकासोबतच्या घटस्फोटाबद्दल मोकळेपणानं बोलला. अरबाजनं सांगितलं की, घटस्फोट घेण्यापूर्वी त्यांनी खूप विचार केला आणि त्यानंतरच हा निर्णय घेतला.

Arbaj khan and Malaika arora
अरबाज खान आणि मलायका अरोरा  |  फोटो सौजन्य: Representative Image

मुंबई: बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरानं २०१७मध्ये आपला २० वर्षांचा संसार मोडत घटस्फोट घेतला. दोघांच्या वेगळं झाल्यानंतर अनेक बातम्या येत होत्या. त्यांच्या घटस्फोटाच्या कारणांबद्दल अंदाज बांधले जात होते. दोघंही घटस्फोटानंतर चांगलेच चर्चेत आहेत. नुकताच अरबाज खान याबाबत मोकळेपणानं बोलला. अरबाज म्हणाला, सर्वकाही ठीक होतं पण तरीही आमचं लग्न मोडलं. जर दोन जणांमध्ये सर्व काही ठिक होत नसेल तर ज्याचं आयुष्य आहे निर्णय त्यांच्यावर सोडणं योग्य असतं.

अरबाज म्हणाला, ‘घटस्फोट घेण्यापूर्वी आम्ही याबाबत खूप विचार केला, याचे फायदे आणि तोटे सर्वच बाबतीत खूप विचार केला. त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की आमचं वेगळं होणंच योग्य राहिल, त्यानं दोघंही चांगले मनुष्य बनू शकू’. अरबाज खाननं पुढे सांगितलं की, आम्ही अशा परिस्थितीत होतो की एकमेकांना त्रास होत होता. त्यामुळं आमच्या जवळच्या व्यक्तींच्या आयुष्यावर सुद्धा परिणाम होत होता.

 

 

आपल्या घटस्फोटाबाबत यापूर्वी मलायकानं म्हटलं होतं की, घटस्फोटानंतर माझ्या डोक्यात अनेक गोष्टी सुरू होत्या. आता पुढे काय होईल? असा विचार यायचा. मला वाटतं अशा परिस्थितीत प्रत्येकाचंच हे होत असेल. आता आयुष्य कुठे वळेल? मलायकानं घटस्फोटानंतर आपण शांत असल्याचं म्हटलं. ती म्हणाली, सुरूवातील ती खूप स्ट्रेस्ड फील करायची मात्र आता तिला शांतता वाटते आणि घटस्फोट घेतल्याचा तिला पश्चाताप होत नाहीय.

घटस्फोटानंतर अरबाज खान आणि मलायका अरोरा दोघंही आपल्या आयुष्यात पुढे सरकले आहेत. जिथं अरबाज खान जॉर्जिया अँड्रियानीला डेट करत आहे. तर दुसरीकडे मलायकाचं नाव अभिनेता अर्जुन कपूरसोबत जोडलं गेलं आहे. दोघं नेहमी एकत्र दिसतात. याबाबत तसं दोघांकडूनही आपल्या नात्याबाबत काही स्पष्ट केलं गेलं नाहीय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Aye aye captain ...... I see u #throwbackthursday ..... #seriouswithdrawlsymptoms #takemebacktomaldives @niyamamaldives

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

अरबाज खान आणि जॉर्जियाच्या प्रेमाची चर्चा होत असतांना, अर्जुन-मलायकाच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. एप्रिल महिन्यातच हे दोघं लग्न करतील, अशी चर्चा आहे. मात्र याबाबत दोघांकडूनही काही स्पष्टीकरण दिलं गेलं नाहीय. मलायका आपल्या स्टाईल, फीटनेसबाबतही चर्चेत आहे. ती सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे आणि आपले फोटो, व्हिडिओ शेअर करते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
‘आमच्या दोघांमध्ये सगळं ठीक होतं पण...’ अरबाज घटस्फोटाबद्दल म्हणाला Description: बॉलिवूड अभिनेता अरबाज खान मलायकासोबतच्या घटस्फोटाबद्दल मोकळेपणानं बोलला. अरबाजनं सांगितलं की, घटस्फोट घेण्यापूर्वी त्यांनी खूप विचार केला आणि त्यानंतरच हा निर्णय घेतला.
Loading...
Loading...
Loading...