Fighter release Update: हृतिक रोशन स्टारर एरियल अ‍ॅक्शन फिल्म 'फायटर'ची रिलीज डेट जाहीर, पुढच्या वर्षी

बी टाऊन
Updated Oct 28, 2022 | 14:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

Fighter release Update: फायटर या सिनेमातून हृतिक रोशन (Hrithik roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika padukone) पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. 'फायटर'(Fighter movie) हा भारतातील पहिला एरियल अ‍ॅक्शन सिनेमा असेल. सिनेमाच्या निर्मात्यांनी त्याची अधिकृत रिलीज डेट जाहीर केली आहे. 'फायटर'मध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण भारतीय वायुसेनेचे पायलट म्हणून दिसणार आहेत. हा सिनेमा 25 जानेवारी 2024 ला रिलीज होणार आहे.

Hrithik starrer Ariel action film fighter release date declared
एरियल अ‍ॅक्शन फिल्म 'फायटर'ची रिलीज डेट जाहीर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एरियल अ‍ॅक्शन फिल्म 'फायटर'ची रिलीज डेट जाहीर
  • हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदा सिल्व्हर स्क्रीन शेअर करणार
  • 25 जानेवारी 2024 ला 'फायटर' सिनेमा रिलीज होणार

Fighter release Update: फायटर या सिनेमातून हृतिक रोशन (Hrithik roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika padukone) पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. 'फायटर' (Fighter movie) हा भारतातील पहिला एरियल अ‍ॅक्शन सिनेमा असेल. सिनेमाच्या निर्मात्यांनी त्याची अधिकृत रिलीज डेट जाहीर केली आहे. 'फायटर'मध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण भारतीय वायुसेनेचे पायलट म्हणून दिसणार आहेत. हा सिनेमा 25 जानेवारी 2024 ला रिलीज होणार आहे. (Ariel action film fighter release date declared hrithik roshan and deepika in lead role)

अधिक वाचा : ट्विटरचे मालक झाले अॅलन मस्क; CEO, CFOची हकालपट्टी

बॉलीवूड निर्माते आता त्यांच्या सिनेमाबाबत खूप संवेदनशील होत आहेत. सिनेमांची बॉक्स ऑफिसवरील कमाई हे याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे आता निर्माते सिनेमा रिलीजच्या तारखा आधीच बुक करताना दिसत आहेत. हृतिक रोशन (Hrithik roshan) आणि दीपिका पदुकोणाच्या (Deepika padukone) सिनेमाचे नावही याच यादीत सामील झाले आहे. 'फायटर' (Fighter movie) या सिनेमाच्या रिलीजची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 

'फायटर' हा सिनेमा 25 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'फायटर' या सिनेमात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण भारतीय वायुसेनेच्या पायलटच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा संपूर्ण अ‍ॅक्शनपॅक्ड सिनेमा आहे. 25 जानेवारी 2023 रोजी दीपिकाचाच शाहरुख खान स्टारर जवान हा चित्रपट रिलीज होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, साऊथचे डायरेक्टर एटली म्हणाले की, हा सिनेमा अ‍ॅक्शनने भरलेला आहे. या सिनेमात दीपिका आणि हृतिकशिवाय अनिल कपूरदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

अधिक वाचा : शारिरीक संबंध ठेवण्यासाठी महिला कधी असतात इच्छूक?

फायटर हा भारतातील पहिला एरियल अ‍ॅक्शन सिनेमा असेल. इंटरनॅशनल खिलाडी आणि रेस 2  या सिनेमांमध्ये आकाशातल्या सीनसाठी व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला होता. मात्र, 'फायटर'मध्ये हे सीन खरे आहेत. अनेक हॉलिवूड सिनेमांमध्ये एरियल अ‍ॅक्शन पाहायला मिळते. 1986 मध्ये पहिल्यांदा टॉम क्रूझच्या 'टॉप गन' या सिनेमात अ‍ॅक्शन दाखवण्यात आली होती. 


हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार

'फायटर' या सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मीती सिद्धार्थ आनंद करत आहे. बॉलीवूडमधील अ‍ॅक्शन सिनेमांसाठी सिद्धार्थ आनंद ओळखले जातात.  सिद्धार्थ आनंदच्या म्हणण्यानुसार, "फायटरसह आम्ही भारताच्या सशस्त्र दलांना श्रद्धांजली वाहणार आहोत". रिपोर्ट्सनुसार, फायटर हा भारतातील पहिला एरियल अ‍ॅक्शन सिनेमा असेल. या सिनेमात पहिल्यांदाच हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्क्रीन शेअर करणार आहेत. एका रिपोर्टनुसार हा सिनेमा 250 कोटींच्या बजेटमध्ये बनवला जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी