Malaika Arjun Wedding । मुंबई : बॉलिवूडचे सर्वात चर्चेत असलेले कपल अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. तुम्ही देखील या बहुचर्चित जोडप्याच्या लग्नाची वाट पाहत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंद देईल. कारण हे दोघे कधी लग्नगाठ बांधणार हे समोर आले आहे आणि अर्थातच लवकरच सनई वाजणार आहे. (Arjun Kapoor and Malaika Arora are getting married soon).
अधिक वाचा : हॉटनेसमुळे महिलेला मिळत नाही काम! काय आहे प्रकरण?
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या चार वर्षांपासून हे जोडपे प्रत्येक प्रसंगात एकमेकांना साथ देताना दिसत असून आता या दोघांनाही लग्नाच्या पवित्र बंधनात अडकायचे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जुन आणि मलायका २०२२ च्या अखेरीस लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.
माध्यमांच्या माहितीनुसार, अर्जुन आणि मलायका ग्रँड लग्न करू इच्छित नाहीत. त्यापेक्षा त्यांना त्यांचे लग्न रजिस्टर करायचे आहे आणि त्यांच्या मित्रांना पार्टी द्यायची आहे. या दरम्यान कुटुंबातील सदस्यांमध्ये संपूर्ण कपूर कुटुंब आणि मलायकाचे पालक सामील होतील. करीना कपूर खान देखील या जोडप्याच्या खूप जवळ आहे, त्यामुळे तिचे नाव देखील पाहुण्यांच्या यादीत समाविष्ट केले जाऊ शकते.
लक्षणीय बाब म्हणजे अर्जुन आणि मलायका नेहमीच त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अर्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये आली तेव्हा लोकांनी तिला खूप ट्रोल करायला सुरुवात केली. अगदी मलायकाचे मीम्स देखील बनवले होते. पण जगाच्या टोमण्यांसमोर अर्जुन मलायकाचे प्रेम कमी झाले नाही आणि आता हे जोडपे अनेक विघ्नानंतर लग्न करणार आहे.