ट्रोलर्सने श्रीदेवीची मलायका अरोराशी तुलना करत अर्जुनला घेरले, मिळाले प्रत्युत्तर

बी टाऊन
Updated May 29, 2019 | 13:09 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

सोशल मीडियावर एका ट्रोलरने मलायका अरोराची तुलना श्रीदेवीशी केली यानंतर अर्जुन कपूर भडकला आणि ट्रोलरला सडेतोड उत्तर दिले. यानंतर ट्रोलरने माफी मागितली.

arjun kapoor and malaika arora
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या अफेयरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र अनेक दिवसांपासून या प्रकरणावर शांत राहिलेल्या अर्जुनने आपल्या आणि मलायकाच्या नात्याला स्वीकारले आहे. दोघांचे नाते समोर आल्यानंतर काही जण या नात्याने खुश आहेत तर काही लोक या गोष्टीवरून या दोघांना ट्रोल करत आहेत. 

सोशल मीडियावर एका ट्रोलरने मलायका आणि अर्जुन यांच्या नात्याची तुलना त्याचे वडील बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्या नात्याशी केली आहे. अर्जुनने या ट्रोलरला सडेतोड उत्तर दिले. खरंतर एका ट्विटर युजरने दोघांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित करताना ट्वीट केले. तो म्हणाला, अर्जुन आपल्या वडिलांची दुसरी पत्नी श्रीदेवीचा तिरस्कार करत होते कारण अर्जुनच्या वडिलांनी श्रीदेवीसाठी त्याच्या आईला सोडले होते. 

अनेकदा सेलिब्रेटी आपल्या ट्रोलर्सकडे लक्ष देत नाहीत. मात्र अर्जुनने याकडे दुर्लक्ष न करता सडेतोड उत्तर दिले आहे. अर्जुने या ट्विटला उत्तर देताना म्हटले, मी कोणाचाच तिरस्कार करत नाही. आम्ही आमच्यात एक अंतर बनवले होते. मी जर त्यांचा तिरस्कार करत असतो त्या दु:खाच्या वेळी मी वडील, जान्हवी आणि खुशीसोबत त्यांच्या बाजूने उभा राहू शकलो नसतो. हे लिहिणे आणि जज करणे सोपे आहे. तु वरूण धवनचा फॅन आहे म्हणून तुला सांगतोय की त्यांचा फोटो आपल्या प्रोफाईलला लावून ही नकारात्मकता पसरवू नकोस.

यानंतर ट्रोलरने आपले ट्वीच डिलीट केले आणि माफी मागितली. त्याने लिहिले की, मी जर कोणाच्या भावनांना ठेच पोहोचवली असेल तर तर माफी मागतो. माझा कोणालाही त्रास देण्याचा हेतू नव्हता.मी काहीही झाले तरी अर्जुन आणि मलायकाच्या नात्याच्या विरोधात नाही. अर्जुनच्या सर्व चाहत्यांची मी माफी. हे केवळ माझे मत होते

ट्विटर युझरने मागी मागितल्यानंतर वरूण धवनने यावर रिप्लाय केला आहे. वरूण म्हणाला, मला आनंद आहे की तु माफी मागितली. अर्जुन त्याच्या लाईफमध्ये अजिबात त्रस्त नाही आहे. सगळेच आपले जीवन जगत असतात. अर्जुनचे मन मोठे आहे. मी नेहमी म्हणतो माझ्या कोणत्याच फॅनने एखाद्या कलाकाराविरोधात चुकीचे काही बोलू नये. अर्जुनने यावर रिप्लाय केला की, ठीक आहे, प्रेम वाटा. स्ट्रीट डान्सर तुझी वाट पाहत आहे.

अर्जुनचा सिनेमा इंडियाज मोस्ट वाँटेडची स्क्रीनिंग काही दिवसांपूर्वी पार पडली. या दरम्यान फोटोग्राफर्सनी अर्जुन आणि मलायका यांना एकत्र फोटोसाठी येण्यास सांगितले असता त्यांनी कपल पोझ दिली. अर्जुने मलायकाच्या कमरेवर हात ठेवून फोटो काढले. यावेळी अर्जुनने मलायकासोबतच्या नात्यावरही महत्त्वपूर्ण खुलासा केला. तसेच आम्ही काही चुकीचे करत नाही आहोत असेही यावेळी म्हटले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
ट्रोलर्सने श्रीदेवीची मलायका अरोराशी तुलना करत अर्जुनला घेरले, मिळाले प्रत्युत्तर Description: सोशल मीडियावर एका ट्रोलरने मलायका अरोराची तुलना श्रीदेवीशी केली यानंतर अर्जुन कपूर भडकला आणि ट्रोलरला सडेतोड उत्तर दिले. यानंतर ट्रोलरने माफी मागितली.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles