Arjun Kapoor trolled : विराट कोहलीच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओवर कमेंट केल्याने अर्जून कपूर ट्रोल

बी टाऊन
Updated Oct 31, 2022 | 20:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

Arjun Kapoor trolled : विराट कोहलीच्या (Virat kohali) हॉटेलच्या रुममधील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विराट कोहलीच्या 'त्या' व्हिडिओवर कमेंट केल्याने अर्जून कपूर (Arjun Kapoor)ट्रोल झाला आहे. यूजर्सने अर्जूनची खिल्ली उडवल्याचंही पाहायला मिळत आहे.

Arjun kapoor trolled for comment on Virat Kohali's post
विराटच्या व्हायरल व्हिडिओवर कमेंट केल्याने अर्जून ट्रोल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • विराटच्या व्हिडिओवर कमेंट केल्याने अर्जून ट्रोल
  • सोशल मीडियावर विराटच्या रुममधील व्हिडिओ व्हायरल
  • बॉलिवूडमधून विराटच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव

Arjun Kapoor trolled : टीम इंडिया सध्या टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup-2022) साठी ऑस्ट्रेलियात (australia) आहे. यातच टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि धुरंधर फलंदाजांपकी एक विराट कोहलीच्या (virat kohli) रूमचा व्हिडिओ लीक झाला आहे. सोशल मीडियावर (social media) व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्याच्या रूममधील सर्व गोष्टी दिसत आहे. दरम्यान, हा व्हिडिओ लीक झाल्याबाबत कोहली खूप भडकला आहे. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. (Arjun kapoor trolled for comment on Virat Kohali's post)

विराटच्या या पोस्टवर बॉलिवूडमधूनही कमेंट्स येत आहेत. वरुण धवनपासून परिणीती चोप्रापर्यंत साऱ्यांनीच कमेंट्स केल्या आहेत. अभिनेता अर्जुन कपूरनेदेखील विराटच्या पोस्टवर कॉमेंट करत,"हे पूर्णपणे अनैतिक" असल्याचं म्हटलं आहे. मात्र, अर्जूनच्या त्या पोस्टवर सोशल मीडिया यूजर्सनी त्याला ट्रोल केलं आहे. एक यूजरने म्हटले आहे, "तुझी मजा आहे तुझे फॅन्स तर कोणीही नाहीत, तर मग व्हिडिओ कोण काढणार?" तर दुसऱ्या एका यूजरने, "हा व्हिडिओ तूच केला असशील Attention seekingसाठी" अशा शब्दात अर्जून कपूरला ट्रोल केले आहे. 


दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विराट कोहलीने इन्स्टाग्रामला एक मोठी पोस्ट शेअर केली आणि संताप व्यक्त केला. विराटने लिहिले होते , मला मान्य आहे की चाहते आपल्या आवडत्या खेळाडूला पाहून खुश होतात. मात्र, या व्हिडिओमुळे माझ्या प्रायव्हसीला तडा गेला आहे. जर माझ्या हॉटेल रूममध्ये जर मला प्रायव्हसी मिळत नसेल तर माझ्या पर्सनल स्पेसबाबत मी काय अपेक्षा करू शकतो. एखाद्याच्या गोपनीयतेचा आपण सन्मान करायला हवा, मनोरंजनासाठी कोणाचाही वस्तू म्हणून वापर होऊ नये असं विराट कोहलीने पोस्टमध्ये म्हटलं आहे." 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Virat Kohli (@virat.kohli)


ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला विराट कोहली सध्या संघासोबत पर्थमधील क्राउन हॉटेलमध्ये आहे. विराट रुममध्ये नसतानाहॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी रुममध्ये जावून व्हिडिओ शूट केला.  त्यानंतर त्यांनी ही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी