Arjun Kapoor Birthday Plan: या सुंदर जागी मलायकासोबत ३७ वा वाढदिवस साजरा करणार अर्जुन; वाढदिवसाच्या प्लॅनची रंगली चर्चा

बी टाऊन
Updated Jun 24, 2022 | 13:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

Arjun Kapoor heads to Paris WITH Malaika arora । बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर २६ जून रोजी त्याचा वाढदिवस साजरा करणार आहे. अर्जुन कपूर २६ जून रोजी ३७ वर्षांचा होणार आहे. अर्जुनचा वाढदिवस स्पेशल बनवण्यासाठी त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोरा खूप उत्सुक आहे.

Arjun Kapoor will be celebrating his 37th birthday with Malaika in paris
या सुंदर जागी मलायकासोबत ३७ वा वाढदिवस साजरा करणार अर्जुन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर २६ जून रोजी त्याचा वाढदिवस साजरा करणार आहे.
  • अर्जुन करणार ३८ व्या वर्षात पदार्पण.
  • अर्जुन कपूर आपला वाढदिवस पॅरिसमध्ये साजरा करणार आहे.

Arjun Kapoor heads to Paris WITH Malaika arora । मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर २६ जून रोजी त्याचा वाढदिवस साजरा करणार आहे. अर्जुन कपूर २६ जून रोजी ३७ वर्षांचा होणार आहे. अर्जुनचा वाढदिवस स्पेशल बनवण्यासाठी त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोरा खूप उत्सुक आहे. अर्जुनच्या वाढदिवसापूर्वीच मलायकाने त्याच्यासाठी एक नाही तर अनेक गिफ्ट पाठवली आहेत. अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो अनेक भेटवस्तू हातात धरलेला दिसत आहे आणि या सर्व भेटवस्तू पॅक केल्या आहेत. हा फोटो शेअर करत अर्जुनने लिहिले की, "७२ तासांपूर्वी ती तुम्हाला आठवण करून देते की हा आपला बर्थडे वीकेंड आहे." (Arjun Kapoor will be celebrating his 37th birthday with Malaika in paris). 

अधिक वाचा : shani dev: शनि देव जुलैमध्ये बदलणार या ३ राशीच्या लोकांचे नश

अर्जुन आणि मलायका पॅरिसला रवाना 

दरम्यान, प्रत्येक वेळी प्रमाणेच यावेळी देखील दोघांनी डेस्टिनेशन बर्थडे सेलिब्रेशनचे प्लॅन्स केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी अर्जुन कपूर आपला वाढदिवस पॅरिसमध्ये साजरा करणार आहे. अर्जुन कपूरची त्याचा खास दिवस साजरा करण्यासाठी पॅरिसला रवाना झाला आहे, सोबतच अर्जुनची गर्लफ्रेंड मलायका अरोरा ही देखील त्याच्यासोबत आहे. 

अर्जुन सध्या खूप व्यस्त आहे. त्याच्याकडे एकापाठोपाठ एक अनेक चित्रपट आहेत आणि तो काही चित्रपटांचे प्रमोशनही करत आहे. त्यामुळे तो अनेक महिने ब्रेक घेऊ शकणार नाही. याच कारणामुळे अर्जुनने मलायकासोबत वेळ घालवण्यासाठी हा प्लॅन केला आहे. मलायकासोबत तो पॅरिसमध्ये वाढदिवस साजरा करेल आणि आनंदही साजरा करेल. 

अर्जुनचे बिझी शेड्यूल 

अरबाज खानपासून वेगळे झाल्यानंतर अर्जुनने मलायकाला डेट करायला सुरुवात केली होती. मलायका अर्जुनपेक्षा १२ वर्षांनी मोठी असून सोशल मीडियावर तिला अनेकवेळा सोशल मीडियावर चाहत्यांच्या ट्रोलचा सामना करावा लागला आहे. वर्क फ्रंटबद्दल भाष्य करायचे झाले तर हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूरचे तीन चित्रपट आघाडीवर आहेत, त्यात 'एक व्हिलन रिटर्न्स', 'कुट्टी' आणि 'द लेडीकिलर' यांचा समावेश आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी