गर्लफ्रेंडसोबत अर्जुन रामपाल झाला रोमांटिक, 'हा' फोटो होतोय व्हायरल

बी टाऊन
Updated Aug 13, 2019 | 09:05 IST

arjun rampal and his girlfriend बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याचा त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. पाहा त्यांचा हा खास फोटो 

arjun_girlfriend_insta
गर्लफ्रेंडसोबत अर्जुन रामपाल झाला रोमांटिक, 'हा' फोटो होतोय व्हायरल  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • अर्जुन रामपाल आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा फोटो होतोय व्हायरल
  • अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड सोशल मीडियावर चर्चेत 
  • २०१८ मध्ये पत्नीपासून वेगळा झाल्यानंतर ग्रॅबिएलाचा जवळ आला अर्जुन 

मुंबई: बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स हे नेहमीच चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वीच दोघंही पालक बनले आहेत. कारण गॅब्रिएलाने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. ज्यामुळे हे जोडपं बरंच चर्चेत होतं. आता पुन्हा एकदा दोघंही चर्चेत आले आहेत. पण यावेळी त्यांनी अपलोड केलेल्या एका फोटोमुळे. हा फोटो सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. त्यामुळेच आता त्याच्याविषयी चर्चा सुरु झाली आहे. 

खरं तर गॅब्रिएलाने इंस्टाग्रामवर तिचा आणि अर्जुनचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती अर्जुनसोबत रोमांटिक होत असल्याचं दिसतं आहे. या फोटोत दोघांचा चेहरा हा एकमेकांकडे आहे आणि दोघांचेही डोळे बंद आहेत. अर्जुन गॅब्रिएला यांचा हा फोटो त्यांच्या चाहत्यांना खूपच पसंत पडला आहे. त्यामुळे या फोटोवर चाहते कमेंट करुन त्यांचं कौतुक करत आहेत. यूजर्सचं म्हणणं आहे की, हा फोटो खरंच खूप सुंदर आहे. तर काही जणांचं असंही म्हणणं आहे की, हे दोघंही एकमेकांसाठीच बनले आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Gabriella Demetriades (@gabriellademetriades) on

 

तुम्हाला ही गोष्ट माहितच असेल की, १८ जुलै २०१९ रोजी गॅब्रिएला आणि अर्जुन यांना अपत्य प्राप्ती झाली. यावेळी गॅब्रिएलाने एका मुलाला जन्म दिला. या दोघांना पुत्ररत्न झाल्याची माहिती प्रसिद्ध दिग्दर्शक जेपी दत्ता यांची मुलगी निधी दत्ता हिने दिली होती. तिने ट्विटरवरुन दोघांना शुभेच्छाही दिल्या होत्या. तिने आपल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं होतं की, 'घरात आनंद आल्याने शुभेच्छा अर्जुन रामपाल!' त्यानंतर अर्जुन आणि गॅब्रिएला यांनी सोशल मीडियावर या बाबतची माहिती दिली होती. दरम्यान, अर्जुन आणि गॅब्रिएला यांनी अद्याप लग्न मात्र केलेलं नाही. 

दोघांनी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ग्रॅबिएला ही हाय स्लिट गाऊन परिधान करन जमिनीवर बसून आपलं बेबी बंप फ्लॉंट करत होती. हा फोटो शेअर करताना अर्जुननं असं म्हटलं होतं की, मी नशीबवान आहे की, तू माझ्यासोबत आहेस आणि मी पुन्हा नव्याने सुरुवात करत आहे. या बाळासाठी मी तुझा आभारी आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Grateful for you two can’t wait to meet you ...

A post shared by Gabriella Demetriades (@gabriellademetriades) on

 

अर्जुनने १९९८ साली केलं होतं लग्न 

अर्जुन रामपालने १९९८ साली मेहर जेसिया हिच्याशी लग्न केलं होतं. त्यांना माहिका आणि मायरा या दोन मुलीदेखील आहेत. अर्जुन आणि मेहरने जवळजवळ २० वर्ष संसार केल्यानंतर २०१८ मध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अर्जुन आणि गॅब्रिएला हे अधिकच जवळ आले होते. तेव्हापासून बऱ्याचदा या दोघांचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत होते. काही महिन्यांपूर्वीच गॅब्रिएला  प्रेंग्नट असल्याचं समोर आलं होतं. तेव्हापासून दोघांबाबत बरीच चर्चा सुरु झाली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
गर्लफ्रेंडसोबत अर्जुन रामपाल झाला रोमांटिक, 'हा' फोटो होतोय व्हायरल Description: arjun rampal and his girlfriend बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याचा त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. पाहा त्यांचा हा खास फोटो 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...