बॉलिवूड ड्रग्स केस: अर्जुन रामपालची NCB च्या ऑफिसमध्ये चौकशी, मित्राला केली अटक

बी टाऊन
Updated Nov 13, 2020 | 13:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

Arjun Rmpal: बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाची नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी केली जात आहे.

arjun rampal
बॉलिवूड ड्रग्स केस: अर्जुन रामपालची NCB च्या ऑफिसमध्ये चौकशी 

थोडं पण कामाचं

  • NCBने सोमवारी अर्जुन रामपालच्या मुंबईतील घरावर छापा मारला होता.
  • त्याच्या घरातून काही मोबाईल फोन आणि लॅपटॉपही जप्त करण्यात आले होते.
  • गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सचीही चौकशी करण्यात आली होती.

मुंबई: ड्रग्स केसमध्ये(Bollywood Drugs Racket)अडकलेला अभिनेता अर्जुन रामपालची(Arjun Rampal) नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो(NCB)कडून चौकशी केली जात आहे. रामपाल साधारण ११.१० वाजता NCBच्या ऑफिसमध्ये पोहोचला. याआधी NCBने अर्जुन रामपालचा मित्र पॉल बर्टेलला अटक केली. तपास एजन्सीने गुरूवारी रात्री उशिरा पॉलला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तब्बल १० तास प्रश्न-उत्तरे झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पॉल हा ऑस्ट्रेलियन वंशाचा आर्किटेक्ट आहे. तो अर्जुन रामपालच्या अनेक पार्टीमध्ये सहभागी होता. अर्जुन रामपाल आणि पॉल यांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाऊ शकते. 

NCBने सोमवारी अर्जुन रामपालच्या मुंबईतील घरावर छापा मारला होता. त्यानंतर बुधवारी आणि गुरुवारी त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सचीही चौकशी करण्यात आली होती. ग्रॅब्रिएलाची आतापर्यंत १२ तास चौकशी करण्यात आली. तपास एजन्सीने सोमवारी अर्जुन रामपालचा ड्रायव्हरलाही ताब्यात घेत काही तास त्याची चौकशी केली होती. NCBच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रामपालच्या घरातून काही बंदी घालण्यात आलेली औषधे सापडली होती. त्याच्या घरात ही औषधे कोठून आली, तसेच त्यासाठी लागणारे अधिकृत प्रिस्क्रिप्शन अर्जुन रामपालकडे आहे की नाही या प्रश्नांची उत्तरे त्याला द्यावी लागतील. 

याशिवाय त्याच्या घरातून काही मोबाईल फोन आणि लॅपटॉपही जप्त करण्यात आले होते. NCBची इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचाही रिपोर्ट आला आहे. हे दाखवूनही त्याला काही सवाल विचारण्यात येतील. 

गेल्या महिन्यात गर्लफ्रेंडच्या भावाला झाली होती अटक

NCBने १९ ऑक्टोबरला गॅब्रिएलाचा भाऊ अगिसिलाओसला लोणावळा येथून अटक केली होती. त्याच्याकडे चरस आणि अल्प्राजोलम गोळ्या आढळल्या होत्या. हाती आलेल्या पुराव्यांच्या आधारे रामपालच्या घरावर छापा मारण्यात आला होता. 

फिरोज नादियादवाला यांचीही झाली चौकशी

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात याआधी प्रसिद्ध निर्माते फिरोज नादियादवाला याच्या घरावरही छापा मारण्यात आला होता. त्यांचीही चौकशी करण्यातआली होती. तसेच त्यांची पत्नी शबाना सईदलाही अटक करण्यात आली होती. दरम्यान शबानाला सोमवारी जामीन मिळाला होता. 

NCBने ड्रग पेडलर्सची चेन ट्रॅक केली

तपास एजन्सीच्या माहितीनुसार, अगिसिलाओस ड्रग्स सप्लाय करत असे. तपास एजन्सीने त्याच्या सप्लाय चेनशी संबंधित सर्व पुरावे गोळा केले आहेत. या चेनमध्ये सामील असलेल्या दुसऱ्या ड्रग पेडलर्सलाही आरोपी बनवण्यात आलेआहे. बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत रिया चक्रवर्तीसह २६ लोकांना अटक करण्यात आली. रिया चक्रवर्तीला ऑक्टोबर महिन्यात कोर्टाकडून जामीन मंजूर झाला होता. तिने २८ दिवस न्यायालयीन कोठडीत घालवले. रियाच्या आधी तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीलाही अटक करण्यात आली होती. तो आजही कस्टडीमध्ये आहे. त्याचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळण्यात आला. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी