Aryan Khan Drug Case : जेल की बेल; आज पुन्हा आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी, आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज नव्हते वकील रोहतगींचा युक्तिवाद

बी टाऊन
भरत जाधव
Updated Oct 27, 2021 | 08:17 IST

Aryan Khan Drug Case : क्रूझ ड्रग्स प्रकरणी (Cruise Drugs Case) अटकेत असणारा बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor)  शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) च्या जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी (Hearing) केली जाणार आहे.

 Aryan Khan's bail plea heard again today
जेल की बेल; आज पुन्हा आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • प्रभाकर साईल यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची न्यायालयाने दखल घेऊ नये - एनसीबी
  • एनसीबीने अधिाकरांचा दुरुपयोग करत आर्यनला पकडले? - वकील रोहतगी
  • या प्रकरणातील मनीष राजगढिया आणि अवीन साहू यांना जामीन मंजूर

मुंबई : Aryan Khan Drug Case : क्रूझ ड्रग्स प्रकरणी (Cruise Drugs Case) अटकेत असणारा बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor)  शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) च्या जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी (Hearing) केली जाणार आहे. काल (मंगळवारी) मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. न्यायालयाचे कामकाज संपल्याने या प्रकरणाची सुनावणी आता आज (बुधवारी) घेतली जाणार आहे. त्यामुळे आर्यन खानची आजची रात्रही तुरुंगातच जाणार की जामीन मिळणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान या प्रकरणातील मनीष राजगढिया आणि अवीन साहू यांना जामीन मंजूर झाला आहे.  

मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी आर्यनचे वकील रोहतगीं यांनी जबरदस्त युक्तीवाद केला. आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, त्यानं ड्रग्ज घेतलेले कोणतेही पुरावे सापडले नाहीत. एनसीबीने अधिाकरांचा दुरुपयोग करत आर्यनला पकडले. त्याची वैद्यकीय चाचणीदेखील केली नाही. अरबाजच्या बुटात काही प्रमाणात ड्रग्ज सापडले, असा युक्तीवाद आर्यन खानचे वकील माजी अॅटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी (former Attorney General Mukul Rohatgi) यांनी सुनावणी दरम्यान न्यायालयात केला.  

दरम्यान आर्यनच्या जामिनाला एनसीबीचा विरोध केला होता. गुणवत्तेच्या आधारावर आर्यनच्या जामिनाची याचिका फेटाळून लावण्याची एनसीबीच्या वकिलांनी मागणी केली होती. तपासाच्या या टप्प्यावर जामीन दिल्यास खटल्यावर थेट परिणाम होईल, असा दावा एनसीबीच्या वतीने करण्यात आला होता. या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल फुटला आहे, त्यामुळे प्रभाकर साईल यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची न्यायालयाने दखल घेऊ नये, अशी विनंती एनसीबीच्या वकिलांनी उच्च न्यायालयात केली होती. 

दरम्यान, आर्यनच्या सुनावणीच्या वेळी कोर्टरुममध्ये प्रचंड गर्दी झाली होती. कोर्टातील गर्दी वाढल्याने न्यायाधीशांनी कामकाज काही वेळ थांबवले होते. गेल्या आठवड्यात बुधवारी विशेष एनडीपीएस कोर्टाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आर्यनच्या वकिलांनी तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात विशेष एनडीपीएस कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्या जामिनावर सुनावणी झाली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी