Aryan Khan Drugs Case: 80 हजाराच्या ड्रग्सची ऑर्डर, मित्रांना NCB च्या कारवाईची धमकी; आर्यन व्हॉट्सअप चॅटवरुन झाला खुलासा

बी टाऊन
भरत जाधव
Updated Oct 26, 2021 | 13:42 IST

Aryan Khan case: आर्यन आणि अनन्या पांडे यांच्या ड्रग्जबद्दलच्या नव्या चॅट्स पाहायला मिळाल्या आहेत. यामध्ये अमली पदार्थांचा बंदोबस्त आणि एनसीबीबद्दल चर्चा झाली आहे.  ही चॅट समोर आल्याने अनन्या पांडेच्या अडचणी वाढत आहेत. 

Aryan Khan Drugs Case: 80,000 drug order, threatening NCB action to friends
80 हजाराच्या ड्रग्सची ऑर्डर, मित्रांना NCBच्या कारवाईची धमकी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आर्यन खानने एनसीबीच्या नावाने आपल्या मित्रांना दम दिला.
  • नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अनन्या पांडे आणि आर्यन खान याच्या व्हॉट्सअपवर झालेल्या ड्रग्सविषयी चॅटसंदर्भात चौकशी करत आहे.
  • आर्यन आणि अनन्या पांडे यांनी व्हॉट्सअॅपवर ड्रग्जबाबत चॅटिंग केल्याची माहिती मिळाली आहे.

Aryan Khan and Ananya Panday WhatsApp Chats । मुंबई : सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) चा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) शी संबंधित ड्रग्स केस प्रकरणी (Drugs Case) आज जामिनावर सुनावणी (Bail Hearing) केली जात आहे. याच दरम्यान अनन्या आणि आर्यन खान यांच्या व्हॉट्स अप चॅटविषयी (WhatsApp Chat) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आर्यन आणि अनन्या पांडे यांच्या ड्रग्जबद्दलच्या नव्या चॅट्स पाहायला मिळाल्या आहेत. यामध्ये अमली पदार्थांचा बंदोबस्त आणि एनसीबीबद्दल चर्चा झाली आहे.  ही चॅट समोर आल्याने अनन्या पांडेच्या अडचणी वाढत आहेत. 

आर्यन खानशी संबंधित या ड्रग्ज प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. त्यात अनन्या आणि आर्यनची धक्कादायक व्हाट्सएप चॅटचे स्क्रीनशॉट्स समोर आले आहे. आर्यन खानच्या जामीनविषयी सुनावणी आज उच्च न्यायालयात केली जात आहे. तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अनन्या पांडे आणि आर्यन खान याच्या व्हॉट्सअपवर झालेल्या ड्रग्सविषयी चॅटसंदर्भात चौकशी करत आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, दोघांनी व्हॉट्सअॅप चॅटमध्ये ड्रग्ज खरेदी करण्यावर चर्चा केली होती.

आर्यन खानने गंमतीत त्याच्या मित्रांना धमकी दिली की ते एनसीबीकडे त्यांच्याविरोधात कारवाई करेल. एनसीबी आता या चॅटचा वापर करून दोघांची चौकशी करत आहे. आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे, तर एनसीबीने अनन्या पांडेची दोनदा चौकशी केली आहे. या दोघांनीही व्हॉट्सअॅपवर ड्रग्जबाबत चॅटिंग केल्याची माहिती इंडिया टुडे टीव्हीला मिळाली आहे. 

व्हाट्सएप चॅट्स कशाबद्दल आहेत?

व्हॉट्सअॅप चॅटमध्ये आर्यन खान मोठ्या प्रमाणात ड्रग्ज खरेदी करण्याबाबत अचित कुमारशी बोलत आहे. आर्यन खानने अचित कुमारकडून 80 हजार रुपयांचे ड्रग्ज मागवले होते. आर्यन खानच्या फोनमधून जप्त करण्यात आलेल्या व्हॉट्सअॅप डेटामध्ये ड्रग्जबद्दल इतर दोन लोकांसोबत ग्रुप चॅट केलेली दिसत आहे. अनन्या पांडे व्यतिरिक्त, एनसीबीकडे इतर तीन सेलिब्रिटी मुलांसोबत आर्यन खानने केलेल्या चॅटची माहिती आहे. काही ड्रग पेडलर आणि सप्लायर आहेत जे त्यांच्या कारवाया वाढवत आहेत आणि बॉलिवूड आणि ग्लॅमरच्या जगात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा दावा एनसीबीने केला आहे. तर एनसीबी अनन्या पांडेकडेही  पेडलरच्या नजरेतून पाहत असून अनन्या चॅट्सनुसार कमी प्रमाणात व्यवहार करत असे.

काय आहे चॅट 

पहिला आक्षेपार्ह चॅट मेसेज जुलै 2019 चा आहे. या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये अनन्या पांडे आणि आर्यन खान यांनी ड्रग्सवर चर्चा केली, ज्याला आर्यनने वीड (गांजा) म्हटले. यावर अनन्या म्हणाली की, त्यासाठी मागणी आहे.

तेव्हा आर्यन खान म्हणाला, "मी तुमच्याकडून गुपचूप घेईन" आणि अनन्याने उत्तर दिले, "ठीक आहे."
एनसीबीच्या म्हणण्यानुसार, प्रथमदर्शनी असे दिसते की अनन्या पांडे आर्यन खानला अल्प प्रमाणात पुरवठा करणारी होती.
त्याच तारखेच्या दुसर्‍या चॅटमध्ये अनन्याने आर्यनला "मी आता व्यवसायात आहे"  असल्याचे सांगत आहे.

अनन्या : आता मी व्यवसायात आहे

आर्यन : तू गांजा(वीड) आणले का?

आर्यन : अनन्या
अनन्या : मला मिळत आहे
NCB ने मिळवलेल्या ताज्या चॅटमध्ये, 18 एप्रिल 2021 रोजी आर्यन खानने त्याच्या दोन मित्रांना कोकेनबद्दल विचारले.
आर्यन - उद्या कोकेन घेऊया (एसआईसी)

आर्यन - मी तुमची  f****d

आर्यन - NCB तर्फे

गंमत म्हणजे आर्यन खानने एनसीबीच्या नावाने आपल्या मित्रांना दम दिला. ड्रग्ज कंट्रोल एजन्सीने त्याला 3 ऑक्टोबर रोजी मुंबईतील एका क्रूझ जहाजातून इतर 8 जणांसह पकडले आणि एका दिवसानंतर त्याला अटक केली. ड्रग्ज प्रकरणात आर्यनला अटक होऊन तीन आठवड्यांहून अधिक काळ लोटला गेला आहे. सत्र न्यायालयाने गेल्या आठवड्यात त्यांची याचिका फेटाळल्यानंतर आज मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होत आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी