Aryan Khan Drugs Case : जामीनसाठी आर्यन खानला मिळतेय 'तारीख पे तारीख'; सुनावणीसाठी High Court ने दिली पुढची तारीख!

बी टाऊन
भरत जाधव
Updated Oct 21, 2021 | 11:44 IST

धवारी एनडीपीएसच्या (NDPS) विशेष न्यायालयाने (Special Court) आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने वकिलांमार्फत तातडीने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.

Aryan Khan Drugs Case High Court gives next date for Bail hearing
Aryan Khan Drugs Case : जामीनसाठी आर्यन खानला मिळतेय तारीख पे तारीख  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • जामीनसाठी उच्च न्यायालयाने दिली पुढची तारीख
  • बुधवारी NDPS च्या विशेष न्यायालयाने सुनावणीमध्ये आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला होता.
  • एनसीबीला आर्यन खानकडून ड्रग्स मिळालेली नाहीत.

मुंबई :  गेल्या जवळपास १७ दिवसांपासून तुरुंगात असलेल्या आर्यन खानचा (Aryan Khan) तुरुंगवास अद्याप संपायची दिसत नाहीये. बुधवारी एनडीपीएसच्या (NDPS) विशेष न्यायालयाने (Special Court) आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने वकिलांमार्फत तातडीने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. तसेच,  सुनावणी तातडीने घ्यावी, अशी मागणी देखील करण्यात आली. मात्र, उच्च न्यायालयानेही (High Court) त्याला पुढची तारीख दिली आहे. उद्या किंवा सोमवारी सुनावणी घेतली जावी, अशी मागणी आर्यनने केली असता न्यायालयाने मात्र थेट मंगळवारी म्हणजेच २६ ऑक्टोबरला सुनावणीची तारीख दिली आहे.

NDPS च्या विशेष न्यायालयानं बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे आता थेट उच्च न्यायायात जामिनासाठी अर्ज करण्याशिवाय पर्याय नव्हता. विशेष न्यायालयाच्या निर्णयानंतर काही वेळातच आर्यनच्या वकिलांनी त्याच्या जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर बुधवारीच याचिका सादर करण्यासाठी आर्यनच्या वकिलांनी प्रयत्नही केला. मात्र ते शक्य होऊ न शकल्याने याचिका गुरुवारी सादर करण्यात आली.

दरम्यान एनसीबीला आर्यन खानकडून ड्रग्स मिळालेली नाहीत. परंतु तो ड्रग्स रॅकेटचा भाग असून शकतो, असा संशय एनसीबीला आहे. शिवाय आर्यनच्या व्हॉट्सअप चॅटिगमधून एनसीबी बरीच माहिती मिळाली आहे. आर्यन खानची बॉलिवूडमधील नवोदित अभिनेत्रीशी व्हॉट्सअप चॅटिग समोर आली आहे. यात त्यांनी ड्रग्स संदर्भात चर्चा केली होती. न्यायालयात वाद-विवाद चालू असताना एनसीबीच्याा पथकाने आरोपीचे चॅट्स न्यायालयाकडे सोपवले आहेत. दरम्यान आतापर्यंत आर्यन खानविरोधात आतापर्यंत एनसीबीचे सर्व आरोप हे व्हॉट्स अप चॅट्सवर आधारित आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी