Aryan Khan | शाहरूख खान दिवाळीनंतर मन्नतवरून हलवणार आर्यनचा मुक्काम? इथे जाऊ शकतो आर्यन

बी टाऊन
विजय तावडे
Updated Oct 31, 2021 | 18:58 IST

Aryan Khan | मुंबईत राहिल्यास प्रसार माध्यमांना टाळणे शक्य होणार नाही. आर्यन यातून सावरण्यासाठी वेळ लागणार आहे. आर्यन अलीबाग येथे राहिल्यास लाइमलाइट आणि चर्चेपासून दूर राहील. अलीबाग येथे शाहरूख खानची आलीशान प्रॉपर्टी आहे.

Aryan Khan Case
आर्यन खान प्रकरण 
थोडं पण कामाचं
  • ऐन दिवाळीच्या तोंडावर आर्यन घरी परतल्यामुळे सध्या शाहरूख खानच्या घरी आनंदाचे वातावरण
  • शाहरूख आणि गौरी खान आपल्या मुलाला प्रसार माध्यमे आणि इतर अडचणींपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्नशील
  • दिवाळीनंतर शाहरूख खान आपल्या मुलाला, आर्यनला मन्नतवरून इतरत्र हलवण्याची शक्यता

Aryan Khan | मुंबई: बॉलीवूड सुपरस्टार शाहरूख खानचा (Bollywood Superstar Shahrukh Khan)मुलगा आर्यन खान याला आता जामिन मिळाला आहे. ३० ऑक्टोबरला आर्यन खान (Aryan Khan) आपल्या घरी म्हणजे मन्नतवर (Mannat) पोचला. शाहरुखच्या चाहत्यांनी ही गोष्ट सेलिब्रेटदेखील केली. आर्यन खान ऐन दिवाळीच्या (Diwali)तोंडावर घरी परतल्यामुळे सध्या शाहरूख खानच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. शाहरूख खानच्या सर्वच कुटुंबासाठी मागील महिना हा अत्यंत तणावाचा आणि संकटांनी भरलेला होता. आता आर्यन खान घरी परतल्यावर शाहरूख आणि गौरी खान आपल्या मुलाला प्रसार माध्यमे आणि इतर अडचणींपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.  (Aryan Khan : Shahrukh Khan may shift Aryan Khan to Alibagh to avoid media attention)

आर्यनला प्रसिद्धीपासून दूर ठेवणार

प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार दिवाळीनंतर शाहरूख खान आपल्या मुलाला, आर्यनला मन्नतवरून इतरत्र हलवण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार शाहरुख दिवाळीचा सण साजरा झाल्यानंतर आर्यनला त्यांच्या अलीबाग येथील फार्महाउसमध्ये शिफ्ट करू शकतात. मुंबईत राहिल्यास प्रसार माध्यमांना टाळणे शक्य होणार नाही. आर्यन यातून सावरण्यासाठी वेळ लागणार आहे. आर्यन अलीबाग येथे राहिल्यास लाइमलाइट आणि चर्चेपासून दूर राहील. अलीबाग येथे शाहरूख खानची आलीशान प्रॉपर्टी आहे. त्यामुळे आर्यन खान नॉर्मल होईपर्यत त्याला अलीबाग येथे ठेवले जाऊ शकते.

आर्यनचा मुक्काम अलीबाग येथे

अर्थात आर्यन खानसाठी पुढील प्रवास सोपा असणार नाही. कारण प्रसारमाध्यमे, शाहरूखचे चाहते आणि देशाचेच लक्ष आगामी काही दिवसांमध्ये त्याच्याकडे असणार आहे. त्यातच आर्यनला जामिन देताना अनेक कठोर अटीदेखील घालण्यात आल्या आहेत. आर्यन खानला मुंबईबाहेर जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याचा पासपोर्टदेखील विशेष न्यायालयाकडे जमा करावा लागणार आहे. आर्यनला भारताबाहेर जाता येणार नाही. त्याचबरोबर आर्यनला दर आठवड्याला एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. शिवाय आर्यनला प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियामध्ये वक्तव्ये करता येणार नाहीत. ड्रग्स प्रकरणातील इतर आरोपींशी बोलण्यासदेखील आर्यन खानला मनाई करण्यात आली आहे.

जामिनासाठी वकिलांना करावा लागला जबरदस्त युक्तिवाद

दरम्यान आर्यनला जामीन मिळवून देण्यासाठी वकिलांना जोरदार युक्तिवाद करावा लागला आहे. क्रूझ ड्रग्स प्रकरणी (Cruise Drugs Case) अटकेत असणारा आर्यन खान (Aryan Khan) च्या जामीन अर्जावर झालेली सुनावणी (Hearing) चांगलीच लांबली होती. मंगळवारी आणि बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. दरम्यान या प्रकरणातील मनीष राजगढिया आणि अवीन साहू यांना आर्यन खानआधीच जामीन मंजूर झाला होता.  ज्येष्ट वकील मुकुल रोहतगी, सतीश मानेशिंदे यांनी आर्यन खानची बाजू न्यायालयात मांडली होती. मागील काही आठवड्यांपासून देशभर याच प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी