Aryan Khan Poses With Siblings AbRam Khan And Suhana Khan: मुंबई: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मोठा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) मुंबई क्रूझ ड्रग्ज (Drugs) प्रकरणामुळे प्रसिद्धीच्या अचानक झोतात आला होता. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला जामीन मिळाल्यापासून त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एकही पोस्ट शेअर केलेली नाही. पण अलीकडेच किंग खानचा मुलगा आर्यन खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर असे काही फोटो शेअर केले आहेत जे काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे फोटो पाहिल्यानंतर प्रत्येकजण आर्यन खान आणि त्याचा भाऊ अबराम आणि बहीण सुहाना खानच्या या फोटोचं कौतुक करत आहे. (aryan khan shared a post after drugs controversy shahrukh khan reacted after seeing these pictures)
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने जवळपास वर्षभरानंतर त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तो त्याचा भाऊ अबराम आणि बहीण सुहाना खानसोबत दिसत आहे. या फोटोंमध्ये आर्यन खान त्याचा धाकटा भाऊ अबराम आणि बहीण सुहानासोबत पोझ देताना दिसत आहे. या फोटोंमध्ये ही तिन्ही भावंडे खूपच क्यूट दिसत आहेत. आर्यन खानने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर हा फोटो शेअर करताच त्याचे वडील शाहरुख खाननेही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्या मुलांचे हे फोटो पाहिल्यानंतर शाहरुख खानने लिहिले की, 'माझ्याकडे हे फोटो का नाहीत, ते मला आताच्या आता द्या.' केवळ शाहरुख खानच नाही तर इतर स्टार्सनीही या फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सुहाना खाननेही प्रतिक्रिया देत 'लव्ह यू' लिहिले. यानंतर त्याने स्वतःला चित्रातून क्रॉप केल्याबद्दल त्याचे आभारही मानले. या फोटोंवर प्रतिक्रिया देताना एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, 'तुम्हा तिघांना एकत्र पाहून आनंद झाला.' दुसरीकडे, आणखी एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, 'ओ आर्यन आम्ही तुला मिस केले.'
अधिक वाचा: Wankhede vs Nawab Malik : मानहानीच्या दाव्यानंतर मलिकांविरोधात SCST कायद्यांतर्गत तक्रार
आर्यन खानची अटक आणि सुटका
आर्यन खान याला २८ ऑक्टोबर २०२१ रोजी सशर्त जामीन देण्यात आला होता. पण त्याआधी साधारण महिनाभर त्याला मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात काढावा लागला होता. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर बराच गदारोळ झाला होता. याप्रकरणात एनसीबीने आर्यन खान याचा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र, उच्च न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला होता. आर्यन खानच्या मोबाइलमधील व्हॉट्सअॅप चॅट्स पाहिल्यास त्यात काहीही आक्षेपार्ह दिसत नसल्याचं न्यायालयाने म्हटलं होतं. आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाझ मर्चंट व मुनमुन धमेचा या तिघांनी कोणतेही कट कारस्थान रचल्याचे त्यातून स्पष्ट होत नसल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं होतं.