Alia Bhatt Ranbir Kapoor: आलिया आणि रणबीरच्या मुलीचं कसं असेल भविष्य? पाहा ज्योतिषाची भविष्यवाणी

बी टाऊन
Updated Nov 06, 2022 | 20:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

Astrologer's prediction for ranbir and alia's daughter : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या घरी छोट्या परीचे आगमन झाले आहे. मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये आलियाने आपल्या मुलीला जन्म दिला. आलिया आणि रणबीरच्या मुलीचे भविष्य कसे असेल ते जाणून घेऊया.

Astrologer's prediction for ranbir and alia's daughter
आलिया-रणबीरच्या मुलीची भविष्यवाणी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आलिया-रणबीरने दिला मुलीला जन्म
  • आलिया-रणबीरच्या मुलीची भविष्यवाणी
  • आलिया-रणबीरच्या मुलीचं भविष्य अभिमान वाटावा असं असल्याचं सांगितलं.

Astrologer's prediction for ranbir and alia's daughter : आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या घरी आज एका मुलीचा जन्म झाला आहे. आलिया भट्टने मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म दिला. आलियाने आपल्या प्रेग्नंसीची बातमी जाहीर केली होती, आणि नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या मुलीचा जन्म झाला. दोघांनीही याच वर्षी एप्रिलमध्ये लग्न केले होते. (Astrologer's prediction for ranbir and alia's daughter)

विशेष म्हणजे या दोघांसाठी हे वर्ष खूप खास आहे. यावर्षी त्यांचा एकत्र पहिला सिनेमा, ब्रह्मास्त्र देखील रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या वर्षी खूप चांगल्या बातम्या असताना, आलिया आणि रणबीरच्या मुलीचे भविष्य कसे असेल ते जाणून घेऊया. ज्योतिषी रमाशंकर उपाध्याय यांच्या मते, रणबीर आणि आलियाची मुलगी तिच्या पालकांना अभिमान वाटेल अशी आहे.

अधिक वाचा : प्रशांत दामलेंचा 12 हजार 500 प्रयोगांचा विक्रम

ज्योतिषी रमाशंकर उपाध्याय म्हणाले, "मुलीचा जन्म रेवती नक्षत्रात झाला आहे, जे मूल नक्षत्रात येते आणि मूळ नाव राजमूल आहे. मुलीचे लग्न मकर लग्न आहे आणि तिच्या लग्नात शनि आहे. ती तिच्या पालकांसाठी तिच्यासाठी आशीर्वाद म्हणून उदयास येईल. म्हणजे ती तिच्या पालकांना आधार देईल आणि त्यांना अभिमान वाटेल." ते पुढे म्हणाले, "तथापि, सध्याच्या काळात पालकांना काही अडचणी येऊ शकतात."

दरम्यान, आलिया भट्टचे वडील आणि नुकतेच आजोबा झालेले महेश भट्ट आपल्या नातीबद्दल खूप आनंदी आहेत. ते म्हणतात हे आमच्या घरचे पहिले नातवंड आहे. मी किती आनंदी आहे हे देखील सांगू शकत नाही. सकाळी रणबीर कपूर आलिया भट्टसोबत रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आला होता. आलिया भट्टला सकाळी साडेसात वाजताच दाखल करण्यात आले. काही वेळापूर्वीच आलियाने सर्वांनाच आनंदाची बातमी दिली. आलियाच्या गोंडस मुलीचा चेहरा पाहण्यासाठी चाहते आता वाट पाहत आहेत.

अधिक वाचा :  बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वापरा 'हे' पदार्थ

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या वर्षी 14 एप्रिल रोजी विवाहबद्ध झाले. लग्नाच्या दोन महिन्यानंतर आलियाने तिच्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती. तेव्हापासूनच आलिया तिच्या प्रेग्नंसीबद्दल सतत चर्चेत होती. आता कूपर कुटुंबात आलेल्या या लक्ष्मीच्या आगमनाने सारेच खूप खुश आहेत. 

आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर 'गंगुबाई काठियावाडी' आणि 'ब्रह्मास्त्र' हे दोन मोठे सिनेमा रिलीज झाले. या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यानंतर आलिया आता 'हार्ट ऑफ स्टोन' आणि 'रॉकी आणि राणीची प्रेमकथा'मध्ये दिसणार आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी