Atrangi Re Review: अतरंगी रे, एक अनोखी प्रेमकथा, सारा-धनुष आणि अक्षयचे सिनेमावर वर्चस्व

बी टाऊन
Updated Dec 24, 2021 | 13:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

Atrangi Re Review: अतरंगी रे म्हणजे, निखळ मनोरंजन, रोमान्स, इमोशनचा तडका आहे. सारा अली खान या सिनेमात छा गयी असं म्हणायला हरकत नाही. ही एक फॅमिली एन्टरटेनर फिल्म आहे.

Atrangi re, is the dawn of pure entertainment, romance, emotion
अतरंगी रे म्हणजे निखळ मनोरंजन, रोमान्स, इमोशनचा तडका  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मनोरंजन, रोमान्स आणि इमोशनचा तडका
  • डिस्ने हॉटस्टारवर रिलीज झाला अतरंगी रे
  • सारा-धनुष आणि अक्षयची धमाल


Atrangi Re Review:  खूप दिवसांनी असा निखळ मनोरंजन, रोमान्स आणि इमोशनचा तडका असा टिपीकल बॉलिवूडपट पाहायला मिळाला आहे. आनंद एल राय यांचं दिग्दर्शन, सारा-धनुष आणि अक्षयचे चोख काम ही सिनेमाची जमेची बाजू आहे असं म्हणायला हरकत नाही. 

Atrangi re': Sara Ali Khan pens a heartfelt note for the makers; says 'I  can't believe my luck' | Hindi Movie News - Times of India

अतरंगी रे च्या कथेतील पात्र तुम्हाला आपलीशी वाटतात, ही कथा सुरुवातीपासूनच मनावर पकड घेते. सिनेमाची सुरुवात बिहारमध्ये होते, रिंकू सूर्यवंशी ( सारा अली खान ) ची आजी ( सीमा बिश्वास ) आणि इतर नातेवाईक तामिळ भाषिक विष्णू (धनुष ) सोबत रिंकूचं जबरदस्तीने लग्न लावतात. मात्र, रिंकूसोबत दिल्लीला परतल्यावर, विष्णू सांगतो की दोन दिवसांनी त्याची एंगेजमेंट होणार आहे आणि ते लव्ह मॅरेज असेल. तर दुसरीकडे रिंकू सांगते की तिचेही दुसऱ्या एका मुलावर प्रेम आहे. त्याचं नाव आहे सज्जाद अली (अक्षय कुमार). सज्जादसाठी, ती गेल्या चौदा वर्षांत 21 वेळा घरातून पळून गेली आणि प्रत्येक वेळी पकडली गेली. त्यामुळे आता दोघंही आपापल्या वाटेने, आपल्या आवडत्या
जोडीदारासोबत जाऊ शकतात. आणि इथूनच खऱ्या अर्थाने सिनेमाला सुरुवात होते. आता पुढे काय होतं? विष्णू आणि रिंकू आपापल्या जोडीदारासोबत जातात का हे सिनेमात उलगडत जाते. 

Atrangi Re' new still: Dhanush, Sara Ali Khan get set to resume film's  shoot in October | Hindi Movie News - Times of India

सिनेमाचं सौंदर्य म्हणजे त्यातील पात्रे. सारा अली खान टिपिकल देसी गर्ल आहे. संपूर्ण कथेच्या केंद्रस्थानी आहे. चित्रपटाची कथा तिच्या आजूबाजूला फिरते.
साराने आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. आनंद एल रायच्या तनु वेड्स मनूने कंगना राणावतच्या कारकिर्दीत जी जादू केली, तीच जादू हा चित्रपट सारासाठी करेल अशी आशा करुया. साराच्या व्यक्तिरेखेला अनेक पदर आहेत आणि तिने अभिनयाच्या माध्यमातून ते रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. 

Atrangi Re is a perfect example of north meets south | Hindi Movie News - Times  of India

चकचक या गाण्यावरील तिचं नृत्य म्हणजे खरंच लाजवाब आहे. धनुष एक हुशार अभिनेता आहे हे तो ठायीठायी दाखवतो. प्रेमाचा विषय असो वा कॉमिक टायमिंग, त्याचं टायमिंग अचूक आहे.अक्षय कुमारची चांगली गोष्ट म्हणजे त्याने त्याच्या भूमिकेची निकड समजून कथेत ती साकारली आहे. ए.आर. रहमानचे संगीत ही सिनेमाची जमेची बाजू, 
एका चित्रपटात खूप दिवसांनी सगळी गाणी ऐकायला आणि गुणगुणण्यासारखी असतात. बऱ्याच काळानंतर रहमान फुल फॉर्ममध्ये आहे.

Fans pour in love for Sara Ali Khan, Dhanush and Akshay Kumar for 'Atrangi  Re' trailer | Hindi Movie News - Times of India

अतरंगी रे सिनेमात रोमान्स, इमोशन आणि ड्रामाने फुल भरलेला आहे. आनंद एल राय यांनी इथल्या सिनेमाची भव्यता कायम ठेवली आहे. अक्षयचे सज्जादचे पात्र आणि रिंकूचे त्याच्यावरचे प्रेम हाच धागा सिनेमात दिसतो. विष्णू आणि रिंकूच्या कथेमध्ये सज्जाद आणि रिंकू प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये एका छान, निखळ मनोरंजन करणाऱ्या सिनेमाचा आस्वाद घ्यायचा असेल तर अतरंगी रे सिनेमाचा एक ऑप्शन ट्राय करायला हरकत नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी