Atarangi Re Trailer : 'अतरंगी रे' चित्रपटाचा अतरंगी ट्रेलर प्रदर्शित; धनुषला मिळेल का साराचं प्रेम, ट्रेलर पाहून चाहत्यांना पडेल प्रश्न

बी टाऊन
भरत जाधव
Updated Nov 24, 2021 | 17:20 IST

Atarangi Re Trailer : दक्षिण चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता (Actor) धनुष (Dhanush) आणि बॉलिवूडचा (Bollywood) खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) यांचा अतरंगी रे (Atarangi Re) चित्रपट (Movie) सध्या खूप चर्चेत आहे.

Atarangi Re movie's Atarangi trailer screened
धनुषला साराचं प्रेम मिळेल? 'अतरंगी रे'चा ट्रेलर प्रदर्शित  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • तीन मिनिटे आठ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये सारा आणि धनुषने अनेकांची मने जिंकली आहेत.
  • पडद्यावर अक्षय कुमार, धनुष, सारा अली खान यांच्या अभिनयाची क्रेमिस्ट्री दिसणार
  • धनुषचा दिग्दर्शक आनंद एल रायसोबतचा अतरंगी रे हा दुसरा चित्रपट आहे.

Atarangi Re Trailer :  मुंबई : दक्षिण चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता (Actor) धनुष (Dhanush) आणि बॉलिवूडचा (Bollywood) खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) यांचा अतरंगी रे (Atarangi Re) चित्रपट (Movie) सध्या खूप चर्चेत आहे.  मंगळवारी या चित्रपटाचे मोशन (Motion) पोस्टर (Poster) प्रदर्शित करण्यात आले होते. ते पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अशातच आता चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा ट्रेलर पाहून चाहत्यांना धनुषला साराचं प्रेम मिळेल का नाही हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. यापुर्वी धनुषला प्रेक्षकांनी रांझणा या त्याला प्रेम मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या प्रेमीच्या रुपात पाहिलं आहे. 

दरम्यान ‘अतरंगी रे’ चित्रपटाच्या ३ मिनिटे आठ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये सारा आणि धनुषने अनेकांची मने जिंकली आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीला धनुषचे अपहरण करुन साराशी लग्न करण्यासाठी आणण्यात आल्याचे दाखवले आहे. पण सारा लग्नाला तयार नसते. कुटुंबीय जबदरस्तीने साराचे लग्न धनुषशी लावून देतात. त्यानंतर सारा आणि धनुष दिल्लीला जातात. तेव्हा त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण होते आणि त्याच वेळी अक्षय कुमारची एण्ट्री होते. साराचे अक्षयवर प्रचंड प्रेम असते. एकंदरीत ट्रेलर पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

याआधी ‘अतरंगी रे’ या चित्रपटाचे तीन टीझर पोस्टर समोर आले होते. या पोस्टरच्या माध्यामातून दिग्दर्शक आनंद एल राय यांनी आपल्या चित्रपटातील तीन प्रमुख व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर मांडल्या होत्या. अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष यांचा बहुचर्चित आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत होता. आता चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत आहे. हा ट्रेलर आतापर्यंत १ लाखपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

‘अतरंगी रे’ हा दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषचा दिग्दर्शक आनंद एल रायसोबतचा दुसरा चित्रपट आहे. या दोघांनी यापूर्वी ‘रांझना’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कलर येलो प्रॉडक्शन आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांनी केली आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणाला २०२० मध्ये सुरुवात झाली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी