Ukraine President Zelensky | नवी दिल्ली : संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार असलेल्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन अमेरिकेत झाले. या अवॉर्ड शोमध्ये अनेक हॉलिवूड स्टार्संनी हजेरी लावली. हा ६४ वा ग्रॅमी पुरस्कार आहे, ज्याचे आयोजन अमेरिकेतील लास वेगास मधील एमजीएम गॅंड ॲरिना येथे करण्यात आले. दरम्यान आता या पुरस्काराचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (Attendance of the President of Ukraine for the Grammy Awards 2022 Grammy Awards).
अधिक वाचा : ST Workers Strike : BMC समोर एसटी कर्मचाऱ्यांचा बोंबाबोंब
दरम्यान, युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमर झेलेंस्की यांनीही ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली. टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओ कॉलद्वारे त्यांनी पुरस्कार सोहळ्यात उपस्थित असलेल्या स्टार्सशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी रशियाशी युद्धाचा सामना करत असलेल्या आपल्या देशासाठी स्टार्सकडून पाठिंबा मागितला. व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की तुम्हाला पाहिजे त्या मार्गाने त्यांच्या देशाचे समर्थन करा.
अधिक वाचा : श्रीलंकेत केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा
राष्ट्रपती झेलेंस्की यांनी म्हटले की, "संगीताचे आणखी विपरीत काय आहे? उध्वस्त शहरे आणि मृतांची शांतता. आपल्या संगीताने यामध्ये शांतता भरा. आमची स्टोरी जगाला सांगण्यासाठी ते आजच भरा. तुम्ही आम्हाला कोणत्याही प्रकारे साथ द्या. मात्र शांत बसू नका." याशिवाय राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेंस्की यांनी इतर अनेक गोष्टींवर भाष्य केले. लक्षणीय बाब म्हणजे ६४ वा ग्रॅमी पुरस्कार यापूर्वी ३१ जानेवारी रोजी लॉस एंजेलिस, यूएसए येथे होणार होता. परंतु ओमिक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे त्याची तारीख आणि जागा बदलण्यात आली.
अवॉर्ड बद्दल भाष्य करायचे झाले तर, यावेळी अमेरिकन गायक जॉन बॅटिस्ट यांना यावेळी सर्वाधिक नामांकन मिळाले आहेत. तर दुसरीकडे लेडी गागाने तिच्या रेड कार्पेट लुक्सने जुने हॉलिवूड ग्लॅमर परत आणले आहे. सिंगर ऑलिव्हिया रॉड्रिगोने पुरस्कार सोहळ्यात तिच्या हिट गाण्यांने रेड लाईटवर उत्कृष्ट परफॉर्मन्स दिला. तर त्याचवेळी पुरस्कार सोहळ्याचे सूत्रधार ट्रेव्हर नोह यांनी फिनीस आडनावाची खिल्ली उडवली आणि तो तोंडातून लोकांची नावे घेणार नसल्याचे सांगितले.