Cursed Movie: या चित्रपटाच्या स्क्रिप्टला होता शाप, ज्या अभिनेत्याने वाचली तो मेला

बी टाऊन
विजय तावडे
Updated Nov 06, 2022 | 21:07 IST

Atuk Movie : एक चित्रपट आहे जो त्याच्या रहस्यांसाठी ओळखला जातो. या चित्रपटाचे नाव अटूक (Atuk)असे आहे. हा हॉलीवूडचा चित्रपट आहे. मात्र याची स्क्रिप्ट तयार असूनही हा चित्रपट कधीच बनला नाही. याला शापित स्क्रिप्ट (Cursed Movie) म्हटले जाऊ लागले. तरीदेखील याच्याविषयी रहस्यमयी चर्चा मात्र होतच राहिल्या.

Horror Movie
रहस्यमयी चित्रपट  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • हॉलीवूडचा एक रहस्यमयी चित्रपट
  • ज्याने चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली तो मेला
  • त्यानंतर स्क्रिप्टच लपवून ठेवण्यात आली

Atuk Horror Movie:नवी दिल्ली : चित्रपट (Movie) हे अनेक कारणांसाठी लक्षात राहतात. कधी कथा तर कधी अभिनय. कधी संगीत तर कधी दिग्दर्शन. काहीवेळा स्पेशल इफेक्टस तर काही वेळा संवाद. काहीवेळा चित्रपटाचा विषयच वादग्रस्त असतो. मात्र असा एक चित्रपट आहे जो त्याच्या रहस्यांसाठी ओळखला जातो.या चित्रपटाचे नाव अटूक (Atuk)असे आहे. हा हॉलीवूडचा चित्रपट आहे. मात्र याची स्क्रिप्ट तयार असूनही हा चित्रपट कधीच बनला नाही. याला शापित स्क्रिप्ट (Cursed Movie) म्हटले जाऊ लागले. तरीदेखील याच्याविषयी रहस्यमयी चर्चा मात्र होतच राहिल्या. ते रहस्य काय आहे आणि या चित्रपटाची कथा काय आहे हे जाणून घेऊया. (Atuk movie is known as cursed movie as 6 actors died after reading script)

अधिक वाचा : प्रशांत दामलेंचा 12 हजार 500 प्रयोगांचा विक्रम

काय आहे या चित्रपटाचे संपूर्ण प्रकरण?

अटूक या चित्रपटाच्या बाबतीत ज्या घटना घडल्या त्यामुळे या चित्रपटाविषयी मोठे रहस्य निर्माण केले. या चित्रपटाविषयीची धक्कादायक बाब म्हणजे या चित्रपटात नायकाची भूमिका करण्यासाठी स्क्रिप्ट ज्याने वाचली त्याचा मृत्यू झाला. ही गोष्ट धक्कादायक असली आणि विश्वास बसण्यासारखी नसली तरी ती खरी आहे. याला आपण कदाचित योगायोग म्हणू शकतो. मात्र असेच खरेच घडले होते. या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचणाऱ्यांच्या मृत्यूची मालिकाच हॉलीवूडने पाहिली. चित्रपटसृष्टीने एकामागून एक मृत्यू पाहिल्यावर सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यामुळे या स्क्रिप्टविषयी एक रहस्य निर्माण झाले.

अधिक वाचा :  बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वापरा 'हे' पदार्थ

हादरवणारी सत्य कथा

या चित्रपटाची कथा ही एक कॅनेडियन कथा आहे. लोककथेनुसार, एक मुलगा अलास्कामध्ये आलेल्या एका मुलीच्या प्रेमात पडतो. मुलगा तिच्या पाठोपाठ न्यूयॉर्कला जातो आणि मोठा माणूस बनतो. पण तो त्या मुलीच्या प्रेमात इतका वेडा झालेला असतो की तो सर्वस्व गमावून मरतो. या कथेवर एक कादंबरी (The Incomparable Atuk) देखील लिहिली गेली. यानंतर दिग्दर्शक नॉर्मन ज्यूसन यांनी पटकथा लेखक टॉड कॅरोल यांना हा चित्रपटावर स्क्रिप्टदेखील लिहिण्यास सांगितले. त्यानंतर हे काम सुमारे 2 वर्षे चालले. कॉमेडियन अभिनेता जॉन बेलुशीचा स्क्रिप्ट वाचल्यानंतर काही दिवसांनी एका हॉटेलमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे मृत्यू झाला.

अधिक वाचा : वास्तुशास्त्रानुसार प्रगतीसाठी अशी हवी बेडरूमची रचना

लागोपाठ 6 जणांचा मृत्यू 

ही स्क्रिप्ट कलाकारांना वाचण्यास दिल्यानंतर त्यांचा एकेकाचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू होऊ लागला. कॉमेडियन अभिनेता सॅम किनिसनचा कार अपघातात मृत्यू आणि जॉन कॅंडीचा हॉटेलमध्ये संशयास्पद अवस्थेत झालेला मृत्यू यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. याशिवाय स्क्रिप्ट देणारी व्यक्ती मायकल ओ'डोनोघ्यू देखील मृत्यूच्या कचाट्यात आली. एवढ्यावरच हे थांबले नाही तर असे मानले जाते की ख्रिस फार्ले आणि जॉन हार्टमन हे दोन्ही अभिनेते अटूकची स्क्रिप्ट वाचल्यामुळेच मरण पावले. त्यामुळे या स्क्रिप्टला शापित स्क्रिप्ट म्हटले जाऊ लागले. शेवटी निर्माता-दिग्दर्शकाने हा प्रोजेक्टच कायमचा बंद केला आणि ही शापित स्क्रिप्ट लपवण्यात आली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी