Atul Kulkarni as Laal Singh Chaddha film writter :'लाल सिंग चड्ढा'द्वारे अभिनेता अतुल कुलकर्णीचे लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण

बी टाऊन
Updated Jul 23, 2022 | 21:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

Atul Kulkarni as film writter: आमिर खान (Aamir Khan) आणि करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) यांची प्रमुख भूमिका असलेला लाल सिंग चड्ढा या सिनेमाच्या निर्मितीची, सिनेमाचे लेखन याबद्दलची गोष्ट खूपच रंजक आहे. वृत्तानुसार या सिनेमाची योजना 14 वर्षांपूर्वी करण्यात आली होती, तर हिंदीत सिनेमाचे लेखन अभिनेता अतुल कुलकर्णीने केले आहे. जो हॉलीवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंप'चा अधिकृत रिमेक आहे. 'फॉरेस्ट गंप'चे हक्क मिळवण्यासाठी निर्मात्यांना अनेक वर्षे लागली.

Atul Kulkarni as film writer
अतुल कुलकर्णीचे लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अतुल कुलकर्णी 'लाल सिंग चड्ढा'चा लेखक
  • सिनेमाची योजना 14 वर्षांपूर्वी करण्यात आली होती
  • पटकथा लेखक म्हणून अतुल कुलकर्णीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

Atul Kulkarni as film writter: आमिर खान  (Aamir Khan) आणि करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) यांची प्रमुख भूमिका असलेला लाल सिंग चड्ढा या सिनेमाच्या निर्मितीची, सिनेमाचे लेखन याबद्दलची गोष्ट खूपच रंजक आहे. वृत्तानुसार या सिनेमाची योजना 14 वर्षांपूर्वी करण्यात आली होती, तर हिंदीत सिनेमाचे लेखन अभिनेता अतुल कुलकर्णीने केले आहे. जो हॉलीवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंप'चा अधिकृत रिमेक आहे. 'फॉरेस्ट गंप'चे हक्क मिळवण्यासाठी निर्मात्यांना अनेक वर्षे लागली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अतुल कुलकर्णीने एका संवादादरम्यान खुलासा केला की, 2008 मध्ये 'जाने तू... या जाने ना' या चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान तो आमिर खानला भेटला होता आणि त्याच्याशी सिनेमाबद्दल बोलले होते. तेव्हाच अतुलला प्रेरणा मिळाली आणि 'लाल सिंग चड्ढा' लिहिण्याची कल्पना सुचली. योगायोगाची गोष्ट म्हणजे आमिर 'जाने तू... या जाने ना'चा निर्माता होता.

अधिक वाचा : कोलेस्ट्रॉल जास्त असल्यास शरीराचा हा भाग देतो इशारा...

अतुल कुलकर्णीने लिहिली लाल सिंग चड्ढाची गोष्ट

 'लाल सिंह चड्ढा' हा हॉलिवूडच्या 'फॉरेस्ट गंप'चा अधिकृत रिमेक आहे. चर्चा करताना हा चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे यावर अतुल कुलकर्णी आणि आमीर खानने एकमत केले. या संभाषणानंतर अतुलने 'लाल सिंग चड्ढा' लिहिण्याचे ठरवले कारण त्याला एका निष्पाप तरुणाची गोष्ट सांगायची होती ज्याला जीवन आनंदाने कसे जगायचे हे कळते.

'फॉरेस्ट गंप'चे हक्क मिळवणे सोपे नव्हते

हा चित्रपट स्वतःच एक उत्कृष्ट उदाहरण आहे, 'लाल सिंग चड्ढा' बनवण्यामागचा प्रवास सोपा नव्हता. 'फॉरेस्ट गंप'चे हक्क मिळवण्यासाठी चित्रपट निर्मात्यांना जवळपास आठ वर्षे लागली. अतुल कुलकर्णी यांना मूळ स्क्रिप्टमधून हिंदी चित्रपट लिहिता आल्याचा आनंद आणि सन्मान वाटतो

अधिक वाचा :  अभिनेते मनोज कुमार यांचा जन्मदिन, जाणून घ्या आजचे दिनविशेष

11 ऑगस्टला रिलीज होणार लाल सिंग चड्ढा

जेव्हा अतुलला विचारण्यात आले की तो व्यावसायिक पटकथा लेखक बनण्याचा विचार करत आहे, तेव्हा अतुलने खुलासा केला की तो व्यावसायिक लेखक नाही आणि मागणी किंवा सक्तीने लिहित नाही. आमिर खान, करीना कपूर खान, नागा चैतन्य आणि मोना सिंग यांच्या प्रमुख भूमिका असलेला लाल सिंग चड्ढा 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी