मुंबईः अभिनेत्री करिना कपूर-खान आणि अभिनेता सैफ अली खान यांना मुलगा झाला. ही बातमी सोशल मीडियावरुन पसरली आणि करिनाच्या धाकट्या मुलाच्या नावावरुन सोशल मीडियावर ट्रोल सुरू झाले. करिनाच्या मुलाचे नाव बाबर असेल असे गृहित धरुन सोशल मीडियावर अनेकांनी मतप्रदर्शन सुरू केले. मीम्सचा पाऊस पडला. (Aurangzeb, Babar trend on Twitter after Kareena Kapoor, Saif Ali Khan welcome Taimur's younger brother)
सैफ अली खान आणि अमृता सिंह यांना दोन मुलं. सारा अली खान आणि इब्राहीम.... काही वर्षांनंतर सैफ आणि अमृता विभक्त झाले... यानंतर काही काळाने सैफ अली खानने करिना कपूर हिच्यासोबत विवाह केला. सैफ अली खान आणि करिनाला झालेल्या पहिल्या मुलाचे नाव तैमुर आहे. यामुळे सैफच्या चौथ्या बाळाचे नाव बाबर असेल अशी शक्यता व्यक्त होत आहे. इब्राहीम आणि तैमुर झाले म्हणजे आता बाबर... अशा स्वरुपाची मते व्यक्त करणाऱ्या पोस्ट आणि ट्वीट यांचा सोशल मीडियावर पाऊस पडला आहे.
करिना आणि सैफ अली खान या दांपत्याला मुलगा झाला. करिनाने २१ फेब्रुवारी रोजी रविवारी मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला. या संदर्भात करिना किंवा सैफ अली खान यांच्याकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र फोटो जर्नलिस्ट विरल भयानी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन ही बातमी दिली. अभिनेता रणबीर कपूरची बहिण रिद्धिमा कपूर सहानीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सैफ आणि बेबोचा फोटो शेअर करत दुसऱ्या बाळाबद्दल अभिनंदन केले. यानंतर करिना आणि सैफ अली खान यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून दांपत्याला शुभेच्छा दिल्या. शुभेच्छांचा वर्षाव सुरू असतानाच काही जणांनी फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून करिना आणि सैफ अली खान यांना बाळाच्या नावावरुन ट्रोल करायला सुरुवात केली.
सैफच्या मोठ्या मुलाचे नाव इब्राहीम आहे. करिना-सैफ यांच्या पहिल्या मुलाचे नाव तैमूर आहे. आता तिसऱ्या मुलाचे नाव ठेवायचे आहे... हे नाव हमखास बाबर असेल.... अशा स्वरुपाची मते व्यक्त करणाऱ्या पोस्ट टाकत अनेकांनी करिना आणि सैफ अली खान यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
करिना दुसऱ्या बाळासाठी गरोदर असताना नवव्या महिन्यापर्यंत काम करत होती. फेब्रुवारी महिन्यात ती बाळाला जन्म देणार असल्याचे करिना आणि सैफ अली खान यांनी स्वतःच जाहीर केले होते. ही बातमी कळल्यापासून सोशल मीडियावर तसेच प्रसारमाध्यमांमध्ये करिनाच्या गरोदरपणाची चर्चा होती. काही दिवसांपूर्वी करिना आणि सैफ अली खान नव्या घरात शिफ्ट झाले. या घरी नव्या बाळाच्या आगमनाआधीच त्याच्या स्वागतासाठी भेटवस्तू जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर आता करिना आणि सैफ अली खान यांच्या दुसऱ्या बाळाच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.