अनुष्काने शेअर केला बेबी बंप असलेला नवा फोटो, विराटने दिली ही प्रतिक्रिया

बी टाऊन
Updated Sep 14, 2020 | 14:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

aushaka sharma baby bump: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लवकरच आई-बाबा बनणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी हा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला.

anushka sharma
अनुष्काच्या फोटोवर विराटने असे काही म्हटले की... 

थोडं पण कामाचं

  • अनुष्का आणि विराट यांनी २७ ऑगस्टला प्रेग्नंसी जाहीर केली
  • या फोटोवर विराट कोहली विराटने अशी कमेंट केली आहे ज्यामुळे त्याचे फॅन भावूक झाले आहेत
  • २०१७मध्ये विराट आणि अनुष्का यांनी इटलीमध्ये लग्नगाठ बांधली होती.

मुंबई: अनुष्का शर्मा सध्या आपला प्रेग्नंसी पिरियड एन्जॉय करत आहे. ती सध्या विराट कोहलीसोबत दुबईत आहे. नुकताच अनुष्का शर्माने बेबी बंप फ्लाँट करतानाचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोवर विराट कोहली विराटने अशी कमेंट केली आहे ज्यामुळे त्याचे फॅन भावूक झाले आहेत. विराट आणि कोहली यांच्या घरात लवकरच नवा पाहुणा येत आहेत. त्यामुळे अनुष्का सध्या तिच्या प्रेग्नंसीमुळे चांगलीच चर्चेत आहे. अनुष्काने आपला नवा फोटो शेअर करत सुंदर कमेंटही केली आहे. आपल्या शरीरामधील एका जीवाच्या निर्मितीचा अनुभव येणे यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाही. जेव्हा हे तुमच्या हातात नसते तेव्हा खऱ्या जगात तुमच्या हातात काय आहे?

या फोटोत अनुष्का बीचवर उभी असून बेबी बंप प्रेमाने न्याहाळत आहे. सफेद रंगाचा टॉप अनुष्काने घातला असून ती एकदम सिंपल दिसत आहे. या फोटोवर लोकांनी कमेंट केली असून तिच्या निरोगी आणि हेल्दी आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावर कोहलीने प्रतिक्रिया देताना असे काही म्हटले आहे की ज्यामुळे प्रत्येक बाप भावूक होईल. विराटने या फोटोवर म्हटले की माझे संपूर्ण जग एका फ्रेममध्ये आहे. 

अनुष्का आणि विराट यांनी २७ ऑगस्टला प्रेग्नंसी जाहीर केली. या दोघांनी फोटो शेअर करताना म्हटले आणि नंतर आम्ही तिघे असू. २०२१मध्ये येत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

And then, we were three! Arriving Jan 2021 ❤️

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

करीना कपूरची कमेंट

अनुष्का शर्माच्या फोटोवर करीना कपूर खानने कमेंट करताना तिला शूर म्हटले आहे. तु सगळ्यात शूर आहेस असं करीनाने लिहिले आहे.यासोबतच करीनाने हार्ट इमोजी बनवला आहे. करीना कपूरच्या या पोस्टवरून स्पष्ट होते की तिला अनुष्का शर्मा किती जवळची आहे.  

२०१७मध्ये विराट आणि अनुष्का यांनी इटलीमध्ये लग्नगाठ बांधली होती. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला होता. जाहिरातीच्या सेटवर पहिल्यांदा अनुष्का आणि विराटची भेट झाली होती. त्यानंतर चार वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. २०१८मध्ये अनुष्का शेवटची झिरो या सिनेमात दिसली होती. 

अनुष्काने निर्माता म्हणून स्वत:ला बिझी ठेवले आहे. पाताळ लोक आणि नेटफ्लिक्सवर बुलबुल हे तिचे नुकतेच शो रिलीज झाले. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी