भारतात अॅव्हेंजर्सची क्रेझ, रिलीजच्या आधी विकली गेली १० लाख तिकीटे

बी टाऊन
Updated Apr 23, 2019 | 15:07 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

बुकमायशो द्वारे अॅव्हेंजर्स द एन्ड गेम या सिनेमाची तिकिटे एका सेकंदाला १८ विकली जात होती. भारतातील थिएटर्समध्ये हा सिनेमा इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु या चार भाषांमध्ये २६ एप्रिलला रिलीज होत आहे.

avengers endgame
अॅव्हेंजर्स एन्डगेम  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: मार्व्हल्स सिनेमाच्या अॅव्हेंजर्स एन्डगेम या सिनेमाची क्रेझ परदेशातच नव्हे तर भारतातही जबरदस्त आहे. येत्या २६ एप्रिल रोजी भारतात अॅव्हेंजर्स: एन्डगेम हा सिनेमा रिलीज होत आहे. हा सिनेमा रिलीज होणार म्हटल्यावर याचे अॅडव्हान्स बुकिंग होणार नाही हे शक्यच नाही. या सिनेमाचे जसे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले तसे या सिनेमाच्या चाहत्यांमुळे तिकीटे बुक करणारी साईट क्रॅश झाली. सुपरहिरोजनी सजलेल्या या सिनेमाच्या केवळ एका दिवसांत तब्बल १० लाख तिकीटांची विक्री झाली. यासोबतच या सिनेमाने सगळे रेकॉर्ड तोडले आहेत.

बुक माय शोवरील माहितीनुसार प्रति सेकंदाला या सिनेमाच्या १८ तिकीटांची विक्री झाली आहे. भारतातील थिएटर्समध्ये हा सिनेमा इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु या चार भाषांमध्ये रिलीज होत आहे. बुक माय शोचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आशिष सक्सेना यांनी सोमवारी संध्याकाळी विधान केले होते की, आम्हाला आशा आहे की अॅव्हेंजर्स- एन्डगेमने अधिक रेकॉर्ड तोडावेत. कारण या सिनेमाची अॅडव्हान्स बुकिंग सुरू आहे. अॅव्हेंजर्स: एन्डगेम मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा २२वा सिनेमा आहे. कॅप्टन मार्व्हलनंतर हा सिनेमा रिलीज होत आहे. कॅप्टन मार्व्हल गेल्या महिन्यात रिलीज झाला होता. कॅप्टन मार्व्हल सिनेमात रॉबर्ट डाऊनी ज्युनियर, क्रिल इव्हान्स, मार्क रफ्फालो, क्रिस हेम्सवर्थ, स्कार्लेट जोहान्सन आणि ब्री लार्सन हे कलाकार होते.

 

 

डिझसने इंडियाचे स्टुडिओ एंटरटेनमेंट प्रमुख विक्रम दुग्गल म्हणाले, अॅव्हेंजर्स : एन्डगेम हा केवळ सिनेमा नाही आहे तर २२ सिनेमांचा एका दशकांचा प्रवासाचे महाकाव्य आहे. देशभरातील चाहत्यांनी या सिनेमाला दिलेला प्रतिसादच या सिनेमाचे यश दाखवून देतो. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सोमवारी ट्वीट केले की अॅव्हेंजर्स:एन्डगेमच्या अॅडव्हान्स बुकिंगला मिळालेला प्रतिसाद जबरदस्त आहे. दिल्ली आणि मुंबई सारख्या महागनरांमध्ये याची क्रेझ मोठी आहे. 

कार्निव्हल सिनेमाजचे उपाध्यक्ष राहुल कदबेट यांनी सांगितले की, साधारण २.२५ लाख तिकीटांची विक्री झाली आहे. या आठवड्यात ही विक्री साधारण ७४ टक्के आहे. आमच्याकडे १००हून अधिक शहरांमध्ये या सिनेमाचे दर दिवसाला १०००हून अधिक शो आहेत. दिल्ली आणि मुंबईत सर्वाधिक तिकीटांची विक्री झाली आहे. 

 

 

आयनॉक्स लीजर लिमिटेडचे मुख्य प्रोगामिंग अधिकारी राजेंद्र सिंह जियाला यांच्या माहितीनुसार, देशभरात या सिनेमाला जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाच्या तिकीटांची जबरदस्त विक्री झाली. या सिनेमाच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
भारतात अॅव्हेंजर्सची क्रेझ, रिलीजच्या आधी विकली गेली १० लाख तिकीटे Description: बुकमायशो द्वारे अॅव्हेंजर्स द एन्ड गेम या सिनेमाची तिकिटे एका सेकंदाला १८ विकली जात होती. भारतातील थिएटर्समध्ये हा सिनेमा इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु या चार भाषांमध्ये २६ एप्रिलला रिलीज होत आहे.
Loading...
Loading...
Loading...