Bollywood News: फोटोतल्या 'या' चिमुरडीनं अजय- सलमानसोबत शेअर केलीय स्क्रीन, ओळखा पाहू कोण आहे ही?

बी टाऊन
Updated Aug 15, 2022 | 16:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bollywood News:फोटोत वडिलांसोबत बसलेली ही गोंडस चिमुरडी मोठी झाल्यानंतरही खूप गोंडस दिसत आहे. अनेक बड्या कलाकारांसोबत तिने सिल्व्हर स्क्रीन शेअर केलेली आहे. तिने काही मोजक्याच सिनेमांमध्ये काम केलं मात्र, प्रत्येक सिनेमात स्वत:ची वेगळी छाप सोडली.

Ayesha takia shared the screen with Ajay Salman Childhood photo of the actress
सलमान-अजयसोबत स्क्रीन शेअर करणारी कोण आहे 'ही' चिमुरडी?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • फोटोतल्या 'या' चिमुरडीने सलमान-अजयसोबत केली स्क्रीन शेअर
  • आयेशा टाकियाचा लूक चेंज
  • आयेशा टाकिया सिल्व्हर स्क्रीनपासून दूर असून ती कुटुंबासोबत आयुष्य एन्जॉय करत आहे.

Ayesha takia : फोटोत वडिलांसोबत बसलेली ही गोंडस चिमुरडी मोठी झाल्यानंतरही खूप गोंडस दिसत आहे. अनेक बड्या कलाकारांसोबत तिने सिल्व्हर स्क्रीन शेअर केलेली आहे. तिने काही मोजक्याच सिनेमांमध्ये काम केलं मात्र, प्रत्येक सिनेमात स्वत:ची वेगळी छाप सोडली. ती कधी सलमान खानची हिरॉईन होती तर कधी अजय देवगणची हिरोईन. वयाच्या 13 व्या वर्षापासूनच कॅमेरा, रोल आणि अँक्शन यांच्याशी तिचं नातं जडलं. बालपणी अनेक अॅड फिल्म्समध्येही ती दिसली आहे. 

अधिक वाचा : या फोटोत लपली आहे एक मुलगी, १५ सेकंदात दाखवा शोधून

आता ती एका राजकारण्याच्या कुटुंबातील सून आहे. आत्तापर्यंत तुम्ही या मुलीला ओळखलेच असेल आणि ज्यांना आतापर्यंत ओळखता आले नसेल, तर मग आम्ही तुम्हाला सांगतो, हा आयशा टाकियाचा बालपणीचा फोटो आहे. आयशा टाकियाने तिचा हा थ्रोबॅक फोटो पोस्ट केला आहे. फॅमिली अल्बममधून शेअर केलेल्या फोटोमध्ये ती तिच्या आई-वडिलांसोबत दिसत आहे. फोटोमध्ये लहान आयशा तिच्या आईच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. तिच्यासोबत तिचे वडीलही बसलेले दिसत आहेत. फोटो शेअर करत आयशाने लिहिले की, "आई, बाबा आणि मी." यासोबतच तिने कॅप्शनमध्ये 'Childhood memories' आणि 'Family' हे हॅशटॅगही लिहिले आहेत.


आयेशा टाकिया आणि फरहान आझमी यांचे २००९ साली लग्न झाले होते. हे जोडपे एका मुलाचे पालक आहेत, ज्याचे नाव त्यांनी मिकेल ठेवले. ती शेवटची 2013 मध्ये आप के लिए हम या चित्रपटात दिसली होती. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाला वेळ हवा आहे. मला वाटते की सर्व पालकांना हे माहित आहे की ही खूप मोठी जबाबदारी आहे. बाळासोबतचा माझा अनुभव खूप छान आहे.

अधिक वाचा : वजन कमी करण्यासाठी सुका मेवा ठरतो फायदेशीर, असे करा सेवन

आयशा टाकिया आता चित्रपटांमध्ये दिसत नाही, परंतु ती सोशल मीडियावर सक्रीय असते. आणि तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. आयशाला इंस्टाग्रामवर 1.2 मिलियन लोक फॉलो करतात. ती बहुतेक फोटोंमध्ये कुटुंब आणि मुलासोबत दिसत आहे आणि  तिच्या कौटुंबिक जीवनाचा आनंद घेत आहे. लूकबद्दल बोलायचे झाले तर तिचा लूक खूप चेंज झालेला आहे. 


आयशा टाकियाने 2004 च्या टारझन: द वंडर कारमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याचबरोबर ये दिल मांगे मोर, सोचा ना था, रोख, सलाम-ए-इश्क, पाठशाला, वाँटेड आणि दूर या चित्रपटांमध्ये काम केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी