Ayodhya Verdict: बॉम्बेपासून ठाकरेपर्यंत... अयोध्या वादावर बनले हे सिनेमा

बी टाऊन
Updated Nov 09, 2019 | 11:46 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Ayodhya Case Verdict: अयोध्या रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन खटल्यावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शनिवारी आला. अयोध्या खटल्याच्या विषयावर काही बॉलिवूड सिनेमा सुद्धा बनवण्यात आले. जाणून घ्या कोणते आहे हे सिनेमा.

ayodhya verdict case ram mandir babri masjid bollywood movies black friday bombay film india news marathi
बॉम्बेपासून ठाकरेपर्यंत... अयोध्या वादावर बनले हे सिनेमा  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • बॉलिवूडमध्ये गेल्या २७ वर्षांत रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर अनेक सिनेमा बनले
  • १९९५ मध्ये रिलीज झालेला मणिरत्नम यांचा 'बॉम्बे' हा सिनेमा या विषयावरचा पहिला सिनेमा
  • अनुराग कश्यप यांचा ब्लॅक फ्रायडे या सिनेमात सुद्धा या विषयाचा संदर्भ आहे

मुंबई: अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालय दिला आहे. या खटल्याच्या निकालाकडे देशाचंच नाही तर जगाचं लक्ष लागलं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या खटल्याचा निकाल येण्याआधीपासूनच पंतप्रधानांसह सर्वांनीच शांतता राखण्याचे आवाहन केले जात आहे.

अयोध्येतील रामजन्मभूमी - बाबदी मशीद जमीन वादाचा संदर्भ बॉलिवूडमधील अनेक सिनेमात घेण्यात आला आहे. १९९५ साली या विषयावर सर्वात पहिला सिनेमा बनला तो मणिरत्नम यांचा बॉम्बे सिनेमा. या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेता अरविंद स्वामी आणि अभिनेत्री मनीषा कोइराला हे मुख्य भूमिकेत होते.

बॉम्बे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला. यासोबतच समिक्षकांनी सुद्धा या सिनेमाचे चांगले रिव्ह्यू दिले होते. या सिनेमाला सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांनी संगीत दिलं होतं. बॉम्बे हा सिनेमा हिंदी भाषेसोबतच तेलुगू भाषेतही डबिंग करण्यात आला होता.

नसीम आणि ब्लॅक फ्रायडे

बॉम्बे सिनेमा सिनेमासोबतच १९९५ मध्ये या विषयावर नीसम हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमातील कहाणी एका शालेय विद्यार्थीनीवर दाखवण्यात आली होती. ही मुलगी आपल्या आजोबांच्या खूपच जवळ होती ज्यांचा बाबरी मशीद वादा दरम्यान मृत्यू झाला होता. सईद अख्तर मिर्झा दिग्दर्शित या सिनेमाला बेस्ट डायरेक्शन आणि स्क्रीनप्लेचा अवॉर्ड मिळाला होता.

२००७ साली आलेल्या अनुराग कश्यप यांचा ब्लॅक फ्रायडे सिनेमा १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्ब स्फोटावर आधारित सिनेमा होता. २००४ साली या सिनेमावर सेंसर बोर्डाने बंदी घातली होती. बाबरी मशीद विध्वंस आणि त्यानंतर मुंबईत झालेली दंगलचा सदर्भ या सिनेमात दाखवण्यात आला आहे.

संजू आणि ठाकरे

२०१८ साली रिलीज झालेल्या अभिनेता संजय दत्त याच्या संजू बायोपिकमध्ये सुद्धा बाबरी मशीद वाद आणि त्यानंतर मुंबईत घडलेल्या घडामोडी दाखवण्यात आल्या. सिनेमात दाखवण्यात आलं आहे की, मुंबईत झालेल्या दंगल दरम्यान सुनील दत्त यांनी कशाप्रकारे पीडितांना मदत केली. त्यांनी मदत केल्याने काही व्यक्तींनी त्यांना धमकी सुद्धा दिली होती.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे हा सिनेमा २०१९ साली रिलीज झाला. या सिनेमात सुद्धा बाबरी मशीद विध्वंस आणि मुंबईत झालेली दंगल याचा संदर्भ घेण्यात आला आहे. या सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत आहे. ठाकरे या सिनेमा व्यतिरिक्त स्लमडॉग मिलेनियर आणि २०११ साली आलेल्या सात खून माफ या सिनेमातही बाबरी मशीद वादाचा संदर्भ आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...