Aayush Sharma: सलमानच्या 'कभी ईद, कभी दिवाली' मधून आयुष शर्मा बाहेर, वाद चव्हाट्यावर? 

बी टाऊन
Updated May 22, 2022 | 13:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

Kabhie Eid Kabhie Diwali | सध्या भाईजान सलमान खानच्या 'कभी ईद, कभी दिवाली' या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. या चित्रपटात पूजा हेगडे आणि शहनाज गिल देखील दिसणार आहेत.

Ayush Sharma out of Salman's 'Kabhi Eid, Kabhi Diwali'
सलमानच्या 'कभी ईद, कभी दिवाली' मधून मेहुणा आयुष शर्मा बाहेर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सलमान खानच्या 'कभी ईद, कभी दिवाली' या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे.
  • सलमानच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
  • सलमानच्या 'कभी ईद, कभी दिवाली' मधून आयुष शर्मा बाहेर.

Kabhie Eid Kabhie Diwali | मुंबई : भाईजान सलमान खानच्या 'कभी ईद, कभी दिवाली' या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. या चित्रपटात पूजा हेगडे आणि शहनाज गिल देखील दिसणार आहेत. मात्र आता सलमानच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे. कारण सलमान खानच्या बहिणीचा पती आयुष शर्मा याने चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आयुष शर्माने अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. (Ayush Sharma out of Salman's 'Kabhie Eid, Kabhie Diwali')

अधिक वाचा : जाणून घ्या IPL प्लेऑफमध्ये कधी, कोण, कोणाशी भिडणार

झहीर इक्बालनेही सोडला चित्रपट

ई टाइम्सच्या वृत्तानुसार, सलमान खानच्या बहिणीचा पती आयुष शर्मा याने काही मतभेदांमुळे या चित्रपटाच्या शूटींगमधून माघार घेतली आहे. माहितीनुसार, 'कभी ईद, कभी दिवाली'च्या टीमने चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. आयुषने त्याचा सीनही दिवसभर शूट केला होता. पण आयुष आणि सलमान खान यांच्यामध्ये काही वाद निर्माण झाले आहेत. इतकेच नाही तर आयुष व्यतिरिक्त झहीर इक्बालनेही चित्रपट सोडला आहे.

हे कलाकार बदलू शकतात

माध्यमांच्या माहितीनुसार, निर्मात्यांनी आयुष आणि झहीरच्या जागेवर इतर कलाकारांचा शोध सुरू केला आहे.  निर्मात्यांनी भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानी आणि जावेद जाफरी यांचा मुलगा मीझान जाफरी यांच्याशी संपर्क साधला आहे. दोघांनीही चित्रपट सोडल्यानंतर शूटिंग थांबले आहे. सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त हा चित्रपट यावर्षी ३० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. बिग बॉस १३ ची स्पर्धक शहनाज गिल देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील शहनाज गिलचा लूक लीक झाला होता.

समोर आला होता फर्स्ट लूक

'कभी ईद कभी दिवाली'मधील सलमान खानचा फर्स्ट लूक समोर आला आहे. फोटोमध्ये सलमान खान काळ्या रंगाच्या डेनिम जॅकेटमध्ये दिसत आहे. या चित्रपटासाठी सलमान खानचे लांब केस असून हातात रॉड आहे. चित्रपटाची मुख्य अभिनेत्री पूजा हेगडे हिने चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. पूजाने हा फोटो तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. यामध्ये तिने हातात सलमान खानचे ब्रेसलेट घातले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी