An Action Hero Trailer: आयुष्मान खुरानाच्या 'An Action Hero' सिनेमाचा ट्रेलर रिलीज, अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा तडका

बी टाऊन
Updated Nov 11, 2022 | 15:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

An Action Hero Trailer release : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana) आगामी सिनेमा 'An Action Hero'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. आयुष्मानच्या या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर चाहत्यांना खूप आवडला आहे. ट्रेलरमध्ये अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा तडका पाहायला मिळत आहे.

 Ayushmann Khurrana An Action Hero Trailer release action and comedy
आयुष्मान खुरानाच्या 'An Action Hero'चा ट्रेलर रिलीज   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आयुष्मान खुराना स्टारर 'An Action Hero' सिनेमाचा ट्रेलर रिलीज.
  • सिनेमात आयुष्मानची अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा तडका अनुभवता येणार आहे.
  • आयुष्मानचा हा सिनेमा २ डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

An Action Hero Trailer release : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana) आगामी सिनेमा 'An Action Hero'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. आयुष्मानच्या या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर चाहत्यांना खूप आवडला आहे. ट्रेलरमध्ये अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा  तडका पाहायला मिळत आहे. (Ayushmann Khurrana An Action Hero Trailer release action and comedy)

आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana ) आगामी सिनेमा 'An Action Hero'चा ट्रेलर नुकताच रिलीज झालेला आहे. आयुष्मानच्या या सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ट्रेलरमध्ये अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा  तडका पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हा ट्रेलर पाहताना तुम्ही लहानपणी खेळलेला चोर-पोलीस हा गेम नक्की आठवेल. अभिनेता जयदीप अहलावत आणि आयुष्मान यांची जबरदस्त टक्कर सिनेमात पाहायला मिळणार आहे. त्याचा थोडासा प्रत्यय ट्रेलरमध्येही येतोय. या दोन्ही कलाकारांचे कॉमेडी टायमिंग जबरदस्त आहे.  

अधिक वाचा : 'या' अभिनेत्रीमुळे शोएब-सानियाचा घटस्फोट?

'An Action Hero'च्या ट्रेलरची धमाल

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना प्रत्येक वेळी सिनेमातून प्रेक्षकांना काही ना काही नवीन देण्याचा प्रयत्न करताना दिसतो. आयुष्मानच्या अभिनय, नृत्य आणि गायनासोबतच त्याच्या स्क्रिप्टच्या निवडीचेही सर्वजण कौतुक करत आहेत. यावेळी आयुष्मान एका दमदार अ‍ॅक्शन, कॉमेडी ड्रामा फिल्म  'An Action Hero'सह थिएटरमध्ये परतण्यासाठी सज्ज आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये आयुष्मान हा एक यशस्वी अ‍ॅक्शन हिरो असल्याचं दाखवण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या अ‍ॅक्शन हिरोवर एका माणसाच्या हत्येचा आरोप आहे. त्यामुळे अटक होण्यापूर्लीट हा हिरो परदेशात पळून गेलेला आहे. 

मात्र, परदेशात गेल्यावरही अडचणी नायकाचा तिथेही पिच्छा सोडत नाहीत. तिथेही त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ज्या व्यक्तीच्या हत्येचा आरोप हिरोवर करण्यात आलेला आहे त्याचा चाहता म्हणजेच सिनेमात जयदीप अहलावत साकारत असलेली व्यक्तीरेखा. हा चाहता हिरोच्या मागावर आहे. आता सिनेमाचं नाव ऐकल्यावर जर तुम्हाला असं वाटत असेल की हा संपूर्ण सिनेमा अ‍ॅक्शनवर आधारित आहे, तर तसं अजिबातच नाही. या सिनेमात अ‍ॅक्शनसह कॉमेडीचा तडकाही तुम्हाला अनुभवता येणार आहे. 

अधिक वाचा : मंथाचा 'यशोदा' सिनेमा सोशल मीडियावर लिक

येत्या 2 डिसेंबरला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सध्या आयुष्मान खुरानाच्या 'An Action Hero' सिनेमाच्या ट्रेलरला (An Action Hero Trailer) प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आता ट्रेलरला मिळणारा प्रतिसाद थिएटरमध्येही मिळणार का हे सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल. 


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी