Ayushmann Khurrana's dream house: आयुष्मान खुरानाचे ड्रीम हाउस, या आलिशान घराची किंमत आहे अनेक कोटींमध्ये

बी टाऊन
Updated Jan 13, 2022 | 12:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ayushmann's dream house: आयुष्मान खुरानाने मुंबईत त्याचे ड्रीम हाउस खरेदी केले आहे, ज्याची किंमत 19 कोटी रुपये आहे. या घराचं पार्किंगही सुसज्ज असल्याचं सांगण्यात येत आहे.

 Ayushmann Khurrana reportedly bought a new apartment in Mumbai
आयुष्मान खुरानाचे मुंबईत ड्रीम हाउस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आयुष्मान खुरानाने खरेदी केले ड्रीम हाऊस
  • आयुष्मानच्या ड्रीम हाउसची किंमत 19 कोटी आहे.
  • आयुष्मानचा आलिशान बंगला, सुसज्ज पार्किंग स्पेस

Ayushmann Khurrana's dream house in mumbai : आयुष्मान खुरानाने अल्पावधीतच बॉलीवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे आणि त्याचे कारण म्हणजे त्याची चित्रपटांची निवड आणि अभिनय. व्यावसायिकदृष्ट्या आयुष्मान सतत स्वत:ला सिद्ध करत आला आहे. आता त्याच्या वैयक्तिक आयुष्यात एक मोठी घडामोड घडली आहे असे सांगितले जात आहे की, आयुष्मान खुरानाने मुंबई या स्वप्नांच्या शहरात त्याचे घर विकत घेतले आहे.

रिपोर्ट्सनुसार, आयुष्मान खुरानाने मुंबईत त्याचे आलिशान घर विकत घेतले आहे. या ड्रीम हाउसची किंमत 19 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या घरासोबत चार गाड्यांसाठी पार्किंगची जागा असल्याचंही म्हटलं जात आहे. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, आयुष्मान लवकरच पत्नी आणि मुलांसोबत नवीन घरात प्रवेश करणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, या घराची नोंदणी 29 नोव्हेंबर 2021 रोजी झाली होती ज्यासाठी अभिनेत्याने 96.50 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. त्याचे हे ड्रीम हाउस 4,027 स्क्वेअर फूटमध्ये पसरल्याचे सांगण्यात येत आहे.


याआधी आयुष्मानने त्याच्या मूळ गावी पंचकुलामध्ये एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. आपले संपूर्ण कुटुंब एकत्र राहावे यासाठी आयुष्मानने हे घर खरेदी केले आहे. 
याबाबत आयुष्मान म्हणाला होता, 'खुरानाझने नवीन फॅमिली होम विकत घेतलं आहे. संपूर्ण कुटुंबाने हे नवीन घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. जिथे संपूर्ण खुराना कुटुंब एकत्र राहू शकेल. कागदावर त्याची किंमत नऊ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.

आयुष्मान खुराना व्यतिरिक्त अर्जुन कपूरने देखील नुकतेच स्वतःसाठी एक नवीन घर घेतले आहे,ज्याची किंमत सुमारे 20 कोटी आहे. अर्जुनचे हे नवीन घर मलायका अरोराच्या घराजवळ आहे.


आयुष्मान खुरानाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर नुकताच त्याचा 'चंदीगढ करे आशिकी' हा चित्रपट रिलीज झाला आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत वाणी कपूर मुख्य भूमिकेत दिसली. या सिनेमाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून दाद मिळाली आहे. याशिवाय आयुष्मान अनुभव सिन्हाच्या ‘अनेक’ या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात आयुष्मानसोबत विकास शर्मा आणि शेफाली गांगुली महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी