नवी दिल्ली : एसएस राजामौलीचा (SS Rajamouli) चित्रपट (movie) 'बाहुबली'ने (Bahubali) अभिनेत्री (Actress) अनुष्का शेट्टीला (Anushka Shetty) जगभरात एक नवीन ओळख मिळवून दिली आहे. साऊथच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीमध्ये अनुष्काचे नाव आहे. आपल्या करिअरमध्ये तिने खूप सुपरहिट चित्रपट केले आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावरही सक्रिय असते. अनुष्काचे सोशल मीडियावर नवीन फोटो व्हायरल होतं आहे, ज्याला पाहून चाहते खूप आश्चर्यचकित झाले आहेत. त्याचबरोबर अनुष्काला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे.
अधिक वाचा : 24 februvary Dinvishesh : 24 फेब्रुवारीला काय आहे दिनविशेष
अनुष्का शेट्टी नुकतीच महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिरात गेली होती. यावेळी तिने या पांढऱ्या रंगाचा सलवार सूट घातला होता. मंदिरात पोहोचल्यावर तिने शंकराची पूजा केली. त्यादरम्यान काही लोकंनी तिचे फोटो क्लिक केले. अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. या फोटोंमध्ये अनुष्काचे वजन वाढलेले दिसत आहे. अशा परिस्थितीत आता बॉडी शेमिंग म्हणजेच वाढलेल्या वजनामुळे तिला ट्रोल केले जात आहे. चाहते कमेंट करत आहेत आणि त्यांना आधीसारखे स्लिम होण्याचा सल्ला देत आहेत.
अनुष्काने बऱ्याच दिवसांनी पब्लिक अपिअरन्स दिला आहे. बऱ्याच दिवसांनी तिला पाहून चाहते पुन्हा एकदा खूश दिसत आहेत. तर तसेच दुसरीकडे वाढलेल्या वजनामुळे आणि लुक्ससाठी तिला ट्रोल केले जात आहे. अनुष्काच्या फोटोवर एका चाहत्याने कमेंट करत असं लिहिले की, 'खूप वाईट वाटत आहे, प्लीज थोड बारीक व्हा. आम्हाला वाटतं की तुम्ही जास्तीत जास्त चित्रपट करावेत." एकजण असं म्हणाला की, 'अनुष्का आणि इलियाना दोघेही आवडत्या आहेत आणि दोघींचे ही वजन वाढले आहे. अनुष्काला सपोर्ट करत एका चाहत्याने लिहिले, 'ती एक योग प्रशिक्षक आहे, त्यामुळे तिला फिटनेस आणि आरोग्याबद्दल शिकवू नका. तुम्हाला स्त्रियांच्या शरीराबद्दल एक टक्काही माहिती नाही.' अनुष्काच्या या फोटोंवर अशा अनेक कमेंट येत आहेत.