बाहुबली फेम भल्लालदेवचा झाला साखरपुडा, पाहा त्याची होणारी बायको

बी टाऊन
Updated May 21, 2020 | 14:21 IST | टाइम्स नाऊ हिंदी

बाहुबली सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता राणा दग्गुबत्तीने मीहिका बजाजसोबत साखरपुडा केला आहे. त्यांच्या सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

rana daggubati
भल्लालदेवचा झाला साखरपुडा, पाहा त्याची होणारी बायको  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • राणा दग्गुबत्तीच्या साखरपुड्याचे फोटोज आले समोर
  • मीहिका बजाजसोबत केला साखरपुडा
  • लग्नाची तारीख अद्याप निश्चित नाही

मुंबई: ब्लॉकबस्टर सिनेमात व्हिलनची भूमिका साकारणाऱ्या भल्लालदेवला कोणीच विसरू शकत नाही. ही भूमिका प्रसिद्ध अभिनेता राणा दग्गुबत्तीने साकारली होती. सध्या राणा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकतेच त्याने आपली गर्लफ्रेंड मीहिका बजाजचा फोटो शेअर करत ऑफिशियल अनाऊंसमेंट केली होती. आता राणा आणि मीहिकाच्या साखरपुड्याचा फोटो व्हायरल होत आहे.

खरंतर राणाने १२ मे रोजी इन्स्टाग्रामवर मीहिकासोहबतचा फोटो शेअर केला होता. यासोबत त्याने लिहिले होते, आणि ती हो म्हणाली. यानंतर हे दोघांच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आले होते. रिपोर्ट्सनुसार, राणा आणि मीहिका २० मे रोजी अधिकृतरित्या साखरपुडा करणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र याला दुजोरा मिळालेला नव्हता. राणाचे वडील सुरेश बाबू या अफवा फेटाळून लावत म्हटले होते की त्यांचा साखरपुडा झाला नाही. त्यासाठीचा दिवस आणि वेळ ठरवली जाईल. मात्र आज राणाने साऱ्यांना सरप्राईज दिल.

राणा दग्गुबत्तीने आपल्या ट्वीटरवर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. यासोबत त्याने लिहिलं की, आणि हे ऑफिशियल झालं. या फोटोंमध्ये राणा आणि मीहिका पारंपारिक अवतारात दिसत आहेत. दोघेही यात खूप सुंदर दिसत आहेत.

याआधी हैदराबाद टाईम्सशी बोलताना राणाच्या वडिलांनी सांगितले की आम्ही नुकतीच मीहिकच्या आई-वडिलांची भेट घेतली. राणाचा अद्याप साखरपुडा झालेला नाही. सुरेश बाबू पुढे म्हणाले, राणा आणि मीहिकाच्या लग्नाला वेळ आहे. आम्ही अजून तारीख ठरवलेली नाही. आम्ही थंडीच्या दिवसांत लग्न करण्याचा विचार करत आहोत. सगळं फायनल झाल्यानंतर याबाबतची घोषणा केली जाईल.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

And she said Yes :) ❤️#MiheekaBajaj

A post shared by Rana Daggubati (@ranadaggubati) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Bring it on 2020… I’m game! #ThisIsYourTime @tissot_official @mansworldindia

A post shared by Rana Daggubati (@ranadaggubati) on

राणाची होणारी बायको मीहिका पेशाने इंटीरियर डिझायनर आहे आणि डेकोरचाही बिझनेस चालवते. तिच्या कंपनीचे नाव ड्यू ड्रॉप डिझाईन स्टुडिओ आहे. यासोबतच तिची कंपनी वेडिंग आणि इव्हेन्ट्सही प्लान करते. मीहिकाने Chelsea University इंटीरियर डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी