कंगना अडचणीत, एफआयआर दाखल करण्याचे वांद्रे न्यायालयाचे आदेश

बी टाऊन
Updated Oct 17, 2020 | 13:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

एका कास्टिंग डायरेक्टरने केलेल्या तक्रारीवर कारवाई करत वांद्रे येथील कोर्टाने बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तिच्यावर समूहांमध्ये द्वेष पसरवण्याचा आरोप आहे.

Kangana Ranaut
कंगना राणावतविरोधात एफआयआर दाखल करण्याचे बांद्रा कोर्टाचे आदेश, खासगी तक्रारीवरून कारवाई  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • याआधी कर्नाटक कोर्टानेही दिले होते एफआयआर दाखल करण्याचे आदेश
  • चित्रपटसृष्टीचे हिंदू आणि मुस्लिम असे विभाजन केल्याचा आरोप
  • सोशल मीडियापासून ते टीव्हीपर्यंत बॉलिवूडविरोधात बोलत आहे कंगना

मुंबई: कास्टिंग डायरेक्टर (Casting director) मुन्ना वराली आणि साहिल अश्रफ सैय्यद यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर (complaint) कारवाई करत वांद्रे येथील न्यायालयाने (Bandra court) बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood actress) कंगना राणावतविरोधात (Kangana Ranaut) एफआयआर (First Information Report) दाखल करण्याचे आदेश (orders FIR) दिले आहेत. तिच्यावर द्वेषपूर्ण वक्तव्ये (hate speech) करून दोन समूहांमध्ये शत्रुता पसरवण्याचा (enmity between two communities) आणि चित्रपटसृष्टीचे (film industry) धर्माच्या आधारावर विभाजन (division on religious grounds) केल्याचा आरोप आहे. ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून (social media account) आणि माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये (television interviews) अशी वक्तव्ये केल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे.

कास्टिंग डायरेक्टरने दाखल केली होती तक्रार

कंगना आणि तिच्या बहिणीविरुद्ध कास्टिंग डायरेक्टर मुन्ना वराली आणि साहिल अश्रफी यांनी ही तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत असा आरोप केला होता की कंगना राणावत ही बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लिम कलाकारांमध्ये दरी निर्माण करत आहे. ती सातत्याने आक्षेपार्ह ट्वीट्स करत आहे ज्यामुळे फक्त धार्मिक भावनाच नाहीत तर चित्रपटसृष्टीतले अनेक लोकही दुखावले जात आहेत.

काय म्हणाले न्यायालय?

कंगना राणावतविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश देताना न्यायालयाने म्हटले की कंगना राणावत सातत्याने बॉलिवूडची बदनामी करण्याचे प्रयत्न करत आहे. सोशल मीडियापासून ते टीव्हीवरील मुलाखतींपर्यंत सगळ्या ठिकाणी ती बॉलिवूडविरोधात बोलत आहे. ती सातत्याने बॉलिवूडला नेपोटिजम आणि फेवरेटिजमचा अड्डा म्हणत आहे.

बॉलिवूडची बदनामी दु:खदायक - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिकच नाही तर सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. आज हॉलीवूड सिनेमांना तोडीस तोड असे सिनेमे बॉलीवूडमध्ये बनत आहे. या बॉलीवूड सिनेमांचा चाहतावर्ग जगभर आहे. सिनेमासृष्टी हा एक मोठे मनोरंजन उद्योग क्षेत्र असून या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते तर सिनेमांमुळे आपले कलाकार लोकप्रिय होतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक वर्गाकडून बॉलीवूडला बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत ते कधीही सहन केले जाणार नाहीत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी