Box office: मिशन मंगल आणि बाटला हाऊस सिनेमाचं दोन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

बी टाऊन
Updated Aug 17, 2019 | 16:10 IST

Mission mangal and batla house Box office collection day 2: अक्षय कुमारचा मिशन मंगल आणि जॉन अब्राहमचा बाटला हाऊस १५ ऑगस्टला रिलीज झाला होता. येथे जाणून घ्या दोन्ही सिनेमांची कमाई. 

Mission mangal vs Batla house
Box office: दोन दिवसात मिशन मंगल आणि बाटला हाऊसची इतके कोटी कमाई 

थोडं पण कामाचं

  • मिशन मंगल आणि बाटला हाऊसची दोन दिवसात चांगली कमाई
  • दोन्ही सिनेमा १५ ऑगस्टला झाले रिलीज
  • पहिल्या दोन दिवसात दोन्ही सिनेमांचं जबरदस्त कलेक्शन

Mission mangal and batla house Box office collection day 2: बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारचा मिशन मंगल आणि जॉन अब्राहमचा बाटला हाऊस सिनेमा १५ ऑगस्टला रिलीज झाला. रिलीज झाल्यानंतर दोन दिवसात या दोन्ही सिनेमांनी चांगलं कलेक्शन केलं आहे. मिशन मंगलनं पहिल्या दिवशी २९.१६ कोटींची कमाई केली. या सिनेमा अक्षय कुमारच्या करिअरमधला सर्वांत मोठा ओपनिंग सिनेमा ठरला आहे. तर बाटला हाऊसनं पहिल्या दिवशी १४.५९ कोटींची कमाई केली. 

पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशीही सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. दुसऱ्या दिवशी अक्षय कुमारच्या मिशन मंगल या सिनेमानं १७.२८ कोटींची कमाई केली. आतापर्यंत मिशन मंगल सिनेमाची एकूण कमाई ४६.४४ कोटी रूपये झाली आहे. 

 

 

मिशन मंगलची कहाणी

मिशन मंगल ही मंगळ ग्रहासंदर्भातील स्पेश मिशन बाबतची खरी कहाणी आहे. सिनेमाची कहाणी मंगळ यानाच्या यशाबद्दल आधारीत आहे. स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) ने मंगळावर मंगळयान पाठवलं होतं. सिनेमा दाखविण्यात आले की कशा प्रकारे मिशन मंगलची सुरूवात झाली होती. तसेच कसे एक एक नायक जोडून एक खास टीम निर्माण करण्यात येते. टीममध्ये चार महिला वैज्ञानिक आहेत. त्या वेगवेगळ्या संस्कृतीतून आणि वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून आल्या आहेत. या महिला एकत्र आल्यावर कशी परफेक्ट टीम तयार होते हे यात दाखविण्यात आलं आहे.

 

 

दुसरीकडे बाटला हाऊस या सिनेमानं ८.८४ कोटी रूपयांची कमाई केली. या सिनेमानं दोन दिवसात एकूण २४.३९ कोटी रूपयांचं कलेक्शन केलं.

 

 

काय आहे सत्य घटना 

१९ सप्टेंबर २००८ रोजी सकाळी ११ वाजता दक्षिण दिल्लीतील जामिया नगरातील एल-१८ बाटला हाऊस येथे दिल्ली पोलिसांचे विशेष दल आणि इंडियन मुजाहिद्दीनचे चार अतिरेक्यांमध्ये चकमक झाली होती. दोन तासांच्या धुमश्चक्रीत आतिफ अमिन आणि महम्मद साजिद ठार यांचा खात्मा करण्यात यश आलं. तर या कारवाई दरम्यान विशेष दलाचे निरीक्षक मोहन चंद शर्मा शहीद झाले.

 

 

१३ डिसेंबर २००८ मध्ये दिल्लीमध्ये अनेक बॉम्ब स्फोट झाले. त्यात २६ जण ठार आणि सुमारे १३३ लोक जखमी झाले होते. यानंतर १ सप्टेंबर रोजी दिल्लीच्या स्पेशल सेलने एका कारवाईत बाटला हाऊसमधील फ्लॅटवर छापा टाकला होता. ज्यामध्ये दोन कथित दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता, परंतु नंतर ही चकमक बनावट होती अशा प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. या चकमकीत संजय कुमार यादव यांनी पोलीस पथकाचं नेतृत्त्व केलं होतं. १९ सप्टेंबरच्या रात्री असं नेमकं काय घडलं होतं हे या सिनेमातून पाहायला मिळणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...