तान्हाजीची बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरूच, तान्हाजीमुळे 'हे' सिनेमे फ्लॉप

बी टाऊन
Updated Feb 05, 2020 | 15:03 IST

Tanhaji, Street Dancer 3, Jawani Janeman box office collection: 10 जानेवारीला रिलीज झालेला अजय देवगणच्या तान्हाजी सिनेमासमोर कोणताच सिनेमा टिकत नाही आहे.

Box Office
तान्हाजीची बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरूच, जाणून घ्या कलेक्शन 

Tanhaji, Street Dancer 3, Jawani Janeman box office collection: 10 जानेवारीला रिलीज झालेल्या तान्हाजी सिनेमाची बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरूच आहे. बॉलिवूड अॅक्टर अजय देवगणच्या सिनेमासमोर बॉक्स ऑफिसवर दुसरा कोणताच सिनेमा टिकत नाही आहे. या सिनेमासोबत रिलीज झालेला अभिनेत्री दीपिका पदुकोणचा छपाक सिनेमाही काही दिवसातच फ्लॉप ठरला. त्यानंतर रिलीज झालेला कंगना राणावतचा पंगा, वरूण धवन- श्रद्धा कपूरचा स्ट्रीट डान्सर आणि सैफ अली खानचा जवानी जानेमन सुद्धा तान्हाजी सिनेमाची घौडदौड थांबवू शकला नाही. 

हा सिनेमा बॉलिवूड अॅक्टर अजय देवगणच्या करिअरमधला सर्वात मोठा सिनेमा बनला आहे. तर सैफ अली खानच्या करिअरमधला हा सिनेमा सर्वात यशस्वी ठरला आहे. या सिनेमानं मंगळवारी (4 फेब्रुवारी) पर्यंत 255.77 कोटींची कमाई केली आहे. मंगळवारी तान्हाजी सिनेमानं 2.05 कोटी रूपयांची कमाई केली, तर स्ट्रीट डान्सरनं 1.35 कोटी आणि जवानी जानेमनं 1.94 कोटी रूपये कमावले. 24 जानेवारीला रिलीज झालेला स्ट्रीट डान्सरची एकूण कमाई आतापर्यंत 68.96 कोटी आणि 31 जानेवारीला रिलीज झालेला जवानी जानेमननं 16.80 कोटी रूपयेचं कमावलेत. 

 

 

 

तान्हाजी सिनेमाची सक्सेस स्टोरी जाणून घेण्यासाठी आम्ही ट्रेड एनालिस्ट रोहित जयस्वाल आणि सुमित कादेल यांच्यासोबत बातचित केली. रोहित जयस्वालनं सांगितलं की, ओम राऊतनं हा सिनेमा खूप सुंदर बनवला आहे. अजय देवगणसहित सर्व कलाकारांनी आपल्या भूमिका चोख निभावली आहे. सिनेमाच्या समीक्षकांनीही या सिनेमाचं कौतुक केलं आणि  त्यामुळे माऊथ पब्लिसिटीचा सिनेमाला फायदा झाला. छपाक सिनेमाला झालेल्या विरोधाचा फायदा तान्हाजी सिनेमाला झाला. 

 

 

 

 

 

ट्रेंड एनालिस्ट सुमित कादेलनुसार, तान्हाजी सिनेमा खूप चांगला आहे. प्रेषकांनाही ऐतिहासिक सिनेमे बघायला आवडतात. फक्त ते सिनेमे चांगल्या पद्धतीनं बनवणं आवश्यक आहे. सिनेमाचे 3D इफेक्ट खूप चांगलं आहे. हा अनुभव प्रेषकांच्या खूप पसंतीस उतरला. हा सिनेमा महाराष्ट्रीयन योद्धाची कथा आहे आणि महाराष्ट्रमध्ये या सिनेमाला खूप पसंती मिळाली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...