66th Filmfare Awards: सर्वोत्कृष्ट अभिनेता इरफान खान आणि अमिताभ बच्चन तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तापसी

बी टाऊन
Updated Mar 28, 2021 | 14:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 66व्या फिल्मफेअर पुरस्कारांची घोषणा शनिवारी करण्यात आली. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे या पुरस्काराच्या विजेत्यांची घोषणा व्हर्च्युअल पद्धतीने करण्यात आली.

Filmfare awards 2021
सर्वोत्कृष्ट अभिनेता इरफान खान आणि अमिताभ बच्चन तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तापसी 

थोडं पण कामाचं

  • फराह खानला दिल बेचारासाठी सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा पुरस्कार
  • सर्वोत्कृष्ट अॅक्शन रमजान बुलुट, आरपी यादव यांना तान्हाजी चित्रपटासाठी
  • अनुभव सिन्हांचा थप्पड ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

66th Filmfare Awards Full list: चित्रपटसृष्टीतील (Film industry) सर्वात प्रतिष्ठेच्या (reputation) मानल्या जाणाऱ्या 66व्या फिल्मफेअर पुरस्कारांची (Filmfare Awards) घोषणा शनिवारी करण्यात आली. कोरोना व्हायरसच्या (corona virus) संकटामुळे या पुरस्काराच्या विजेत्यांची घोषणा व्हर्च्युअल पद्धतीने (virtual method) करण्यात आली. तांत्रिक पुरस्कार (technical awards) विभागात फराह खानला (Farah Khan) दिल बेचारा (Dil Bechara) या चित्रपटासाठी (film) सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा (best choreography) पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्कृष्ट अॅक्शनसाठीचा (best action) पुरस्कार रमजान बुलुट, आरपी यादव यांना तान्हाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटासाठी मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट संवादाचा (best dialogue) पुरस्कार गुलाबो सिताबो (Gulabo Sitabo) या चित्रपटाला मिळाला आहे.

पाहा फिल्मफेअर पुरस्कार विजेत्यांची पूर्ण यादी

सर्वोत्कृष्ट चित्रपट - थप्पड़

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - ओम राऊत (तान्हाजी: द अनसंग वॉरियर)

सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स) – प्रतीक वस्त (EEB ALLAY OOO!)

सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रमुख भूमिका - इरफान खान (अंग्रेजी मीडियम)

सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रिटिक्स - अमिताभ बच्चन (गुलाबो सिताबो)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रमुख भूमिका - तापसी पन्नू (थप्पड़)

सर्वोत्कृष्ट अभिनेता सहाय्यक व्यक्तिरेखा - सैफ अली खान (तान्हाजी: द अनसंग वॉरियर)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सहाय्यक व्यक्तिरेखा - फारूक जफर (गुलाबो सिताबो)

सर्वोत्कृष्ट कथा - अनुभव सुशीला सिन्हा आणि मृण्मयी लागू वायकुळ (थप्पड़)

सर्वोत्कृष्ट पटकथा - रोहन गेरा (सर)

सर्वोत्कृष्ट चित्रपट (फिक्शन) - अर्जुन

सर्वोत्कृष्ट लघुपट (पॉप्युलर चॉईस) - देवी

सर्वोत्कृष्ट लघुपट (नॉन फिक्शन) - बॅकयार्ड वाईल्डलाइफ सेंचुरी

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (लघुपट) - पूर्ति सावरडेकर 

सर्वोत्कृष्ट अभिनेता (लघुपट) - अरनव 

सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन - फराह खान (दिल बेचारा)

सर्वोत्कृष्ट सिनमॅटोग्रॉफी - अविक मुखोपाध्याय (गुलाबो सिताबो)

सर्वोत्कृष्ट संवाद: जूही चतुर्वेदी (गुलाबो सीताबो)

सर्वोत्कृष्ट अॅक्शन: रमजान बुलुट, आरपी यादव (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)

सर्वोत्कृष्ट व्हीएफएक्स - प्रसाद सुतार (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)

सर्वोत्कृष्ट पोषाख - वीरा कपूर ईई (गुलाबो सिताबो)

सर्वोत्कृष्ट साउंड डिझाईन - कामोद खाराड़े (थप्पड़)

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन - मानसी ध्रुव मेहता (गुलाबो सिताबो)

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - मंगेश उर्मिला धाकड़े (थप्पड़)

सर्वोत्कृष्ट संगीत – प्रीतम (ल्यूडो)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - राघव चैतन्‍य (एक टुकडा धूप, थप्पड)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - असीस कौर (मलंग, मलंग)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी