सलमानचा 'भारत' सिनेमा लवकरच गाठणार 200 कोटींचा टप्पा, दिशा पटानीच्या नावावर झाला हा रेकॉर्ड

बी टाऊन
Updated Jun 12, 2019 | 15:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bharat reaches 200 crore mark: सलमान खानचा भारत सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. रोज नवनवीन रेकॉर्ड कायम करताना दिसतोय. सिनेमा आता 200 कोटींजवळ पोहोचलाय.

Salman Khan Bharat reaches 200 crore mark at Box Office
सलमानच्या भारत सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड सुरुच, लवकरच गाठणार 200 कोटींचा टप्पा 

मुंबई: सलमान खानचा भारत सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस काबीज करताना दिसत आहे. सिनेमाची चर्चा जोरदार आहे आणि त्याची प्रचिती सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमधून स्पष्ट दिसत आहे. सिनेमाने पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली. आता सिनेमा लवकरच दुसऱ्या आठवड्यात पदार्पण करत आहे पण त्या आधीच सिनेमाच्या नावावर अनेक रेकॉर्ड कायम झाले आहेत.

पहिल्या आठवड्यात 100 कोटींच्या क्लबमध्ये सिनेमा पोहचला शिवाय पहिल्या दिवशी 42 कोटी 30 लाखांची कमाई करत सिनेमाने 2019च्या सगळ्यात मोठ्या ओपनिंगचा नवीन रेकॉर्ड बनवला. या आधी हा रेकॉर्ड पहिल्या दिवशी 21.60 कोटींची कमाई करत कलंक सिनेमाने केला होता. भारत सिनेमा रिलीजच्या 7 दिवसानंतर तब्बल 200 कोटींच्या जवळ पोहचला असून लवकरच हा आकडा सुद्धा पार करेल अशी चिन्ह आहेत.

सिनेमाने पहिल्या दिवशी 42.30 कोटी तर दूसऱ्या दिवशी 31 कोटींची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी हा आकडा 22.20 कोटी होता, चौथ्या दिवशी 26.70 कोटींचा गल्ला जमवला. तर बॉलिवूडच्या या ब्लॉकबस्टर भारतने पाचव्या दिवशी 27.90 कोटी कमावले, सहाव्या दिवशी 9.20 कोटी आणि सातव्या दिवशी 8.30 कोटी कमाई झाली. अस करत या सिनेमाने आत्तापर्यंत 167.60 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे हा आकडा 8व्या दिवसाला 175 कोटींच्या घरात जाईल असा अंदाज प्रसिद्ध फिल्म क्रिटीक तरण आदर्श यांनी वर्तवला आहे. तर येत्या विकेन्डला या आकड्यात नक्कीच वाढ होताना दिसेल आणि तो 200 कोटींच्या घरात जाईल असा अंदाज सुद्धा सध्या वर्तवला जात आहे.

त्याचसोबत हा सिनेमा 100 कोटींच्या घरात पोहचताच सिनेमात झळकणाऱ्या अभिनेत्री दिशा पटानीसाठी एक नवीन रेकॉर्ड कायम झाला. तिची 100 कोटी क्लबच्या सिनेमांची हॅटट्रीक पूर्ण झाली आहे. या आधीचे तिचे 'एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' आणि 'बागी 2' हे सिनेमे सुद्धा 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे भारतसोबत दिशासाठी पण नवा रेकॉर्ड कायम झाला आहे.

सध्या भारत या सिनेमाची घोडदौड बॉक्स ऑफिसवर सुरु आहे आणि पुढचे काही दिवस तरी ती अशाच प्रकारे सुरु राहणार आहे असं दिसत आहे. सिनेमात भारत या व्यक्तीची कथा दाखवण्यात आली आहे ज्याचा प्रवास भारत या देशासोबत 1947पासून ते 2010पर्यंत होताना दिसतो. सिनेमात सलमानच्या अपोझिट कतरिना कैफ दिसून येते, त्याचसोबत सिनेमात दिशा पटानी, जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोवर, सोनाली कुलकर्णी यांच्या सुद्धा महत्त्वाच्या भूमिका आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी