VIDEO: सलमान खानच्या बहुप्रतिक्षित 'भारत'चा ट्रेलर लाँच

बी टाऊन
Updated Apr 22, 2019 | 15:16 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

सलमान खानच्या 'भारत' या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा केली जात आहे. नुकताच याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यात सलमान खानने साकारलेल्या पात्राचे संपूर्ण आयुष्य रंगवण्यात आले आहे.

bharat cinema
भारत सिनेमा  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानचा सिनेमा 'भारत'ची प्रतीक्षा गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. काही दिवसांपासून सलमान दररोज आपल्या या सिनेमाने नवेनवे पोस्टर्स शेअर करत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. यात तो एकमद इंप्रेसिव्ह दिसत आहे. ट्रेलरची सुरूवातच सलमानच्या डायलॉगने होत आहे. यात तो म्हणतोय, ७१ वर्षांपूर्वी हा देश बनला आणि तेव्हापासून माझी कहाणी सुरू झाली. एक मिडल क्लास वयोवृद्ध व्यक्ती म्हणून सलमान यात एंट्री करतो आणि आपल्या आयुष्याची कहाणी सांगतो. 

 

 

त्यानंतर सलमानचा रेट्रो लूक आपल्यासमोर येतो. सिनेमाच्या सुरूवातीला दिशा पटानी दिसणार अशी चर्चा होती. मात्र पोस्टर्समध्ये ती दिसली नव्हती. आता ट्रेलरच्या सुरूवातीलाच दिशा दिसते. सिनेमात सलमानचे नाव भारत असे आहे. त्यामुळे भारत नावासोबत आडनाव का लावता येणार याचेही कारण तो सांगतो. कतरिना कैफ यात मॅडम सर आहे. दोघांची केमिस्ट्रूी यात दिसत आहे. मात्र सिनेमात नेहमीची लव्हस्टोरी नाही आहे तर खरी कहाणी तर यानंतर सुरू होते. सिनेमात जॅकी श्रॉफने सलमानच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. काही सीन्समध्ये नोरा फतेही, सुनील ग्रोव्हरही दिसत आहे. 

 

 

 

 

 

 

 

 

या सिनेमाचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात मुख्य भूमिका निभावणाऱ्या सलमानच्या खानचे संपूर्ण आयुष्य यात दाखवण्यात आले आहे. अनेकांना हा ट्रेलर आवडला आहे. तीन मिनिटे ११ सेकंदाचा हा ट्रेलर आहे. सिनेमाच्या संपूर्ण प्रवासात सलमानचे विविध लूक दाखवण्यात आले आहे. ट्रेलरच्या अखेरीस सलमान भारताच्या बॉर्डरवर उभा राहत कतरिनाकडे हसत पाहत आहे. सलमान आणि कतरिनाचा हा सिनेमा ५ जून २०१९ला रिलीज होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
VIDEO: सलमान खानच्या बहुप्रतिक्षित 'भारत'चा ट्रेलर लाँच Description: सलमान खानच्या 'भारत' या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा केली जात आहे. नुकताच याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यात सलमान खानने साकारलेल्या पात्राचे संपूर्ण आयुष्य रंगवण्यात आले आहे.
Loading...
Loading...
Loading...