तुम जियो हजारो साल... गानकोकिळा लता मंगेशकर यांचा ९०वा वाढदिवस

बी टाऊन
Updated Sep 29, 2019 | 08:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

गानसम्राज्ञी लता मंगेशकर या २८ सप्टेंबर यादिवशी ९०वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या चाहत्यांसाठी आज मोठा आनंदाचा दिवस आहे.

Entertainment news of  lata mangeshkar about her birthday the news at mumbai in maharashtra
आवाजांची जादूगर लता मंगेशकर साजरा करणार ९० वा वाढदिवस   |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा २८ सप्टेंबर यादिवशी ९० वा वाढदिवस आहे. लाखो रसिक प्रेक्षकांसाठी आज आनंदाचा दिवस आहे. लता मंगेशकरांना हिंदी चित्रपटाची एक महान गायिका म्हणून ओळखले जाते. १९४२ मध्ये त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात केली. लतादीदींच्या गाण्याने सर्व लोकांवर एक वेगळीच जादू केली आहे. आपल्या स्वर्गीय स्वरांमधून त्यांनी चाहत्यांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला आहे. 

लतादीदींनी या क्षेत्रात उत्कृष्ट  कामगिरी केली आहे. त्यासाठी त्यांना भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, दादासाहेब फाळके आणि कितीतरी असे अनेक पुरस्कार लताजींनी आपल्या जीवनात गाण्याच्या माध्यमातून मिळवले आहेत. आजची पीढीसूद्धा लतादीदींचं गाणं गुणगुणत असते. 

 लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीत आपल्या लहानपणीची आठवण सांगितली -

'माझ्या जीवनात सगळ्यात मोठी त्रासदायक गोष्ट म्हणजे लवकर राग येणे ( टेंपर ). मला लहानपणी लवकर राग यायचा. पण, जशी मी मोठी होत गेले त्याप्रमाणे माझ्या जीवनात बदल घडून आला. एक वेळ अशी आली की माझा राग आयुष्यातून कायमसाठी निघून गेला. माझ्या पालकांनी मला शिकवलं की, जर कोणी चूक केली तर त्याला मोठ्या मनानं माफ करावं आणि ती गोष्ट विसरून जावी. अशा विचारांनी मी आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग शोधला आणि मला यश मिळाले आहे.' 

लता मंगेशकर यांच्या जीवनावर आधारित "बेस्ट ऑफ लता " या पुस्तकाचं प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि लतादीदींच्या बहीण ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्याकडून त्यांच्या ९०व्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी