Drugs Case: ड्रग्स प्रकरणात भारती अन् हर्षच्या अडचणी वाढणार, एनसीबीने दाखल केली चार्जशीट

बी टाऊन
भरत जाधव
Updated Oct 29, 2022 | 13:23 IST

21 नोव्हेंबर 2020 रोजी, NCBने भारती सिंग आणि तिच्या पतीच्या प्रोडक्शन-हाउस ऑफिस आणि निवासस्थानावर छापा टाकला आणि 86.5 ग्रॅम गांजा जप्त केला. त्यानंतर या जोडप्याला अटक करण्यात आली.

Bharti and Harsh's problems will increase in the drug case
ड्रग्स प्रकरणात भारती अन् हर्षच्या अडचणी वाढणार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
  • मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने प्रत्येकी 15 हजार रुपयांची सुरक्षा ठेव जमा केल्यानंतर जामीन मंजूर करण्यात आला होता.
  • 14 जून 2020 रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने त्याच्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती.

Bharti Singh And Harsh Drugs Case: अभिनेता (Actor) सुशांत सिंह राजपूतच्या ( Sushant Singh Rajput)मृत्यूनंतर ड्रग्ज (drugs) मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांची नावे या प्रकरणात अडकली होती. यामध्ये कॉमेडियन (Comedian) भारती सिंग (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष यांचाही सहभाग होता.   
आता या प्रकरणातील ताजे अपडेट समोर आले आहे की, एनसीबीने या दोघांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. लवकरच या दोघांविरुद्ध न्यायालयात खटला सुरू होणार आहे. सध्या दोघेही जामिनावर बाहेर आहेत. (Bharti and Harsh's problems will increase in the drug case, NCB has filed the charge sheet)

अधिक वाचा  : साध्या आणि प्रामाणिक पुरुषांना स्त्रिया का मानतात मूर्ख?

घरात मिळाले होते ड्रग्स 

21 नोव्हेंबर 2020 रोजी, NCBने भारती सिंग आणि तिच्या पतीच्या प्रोडक्शन-हाउस ऑफिस आणि निवासस्थानावर छापा टाकला आणि 86.5 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी या  जोडप्याला अटक करण्यात आली. त्यानंतर दोघांनाही न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले, त्यानंतर त्यांना 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र या जोडप्याला 23 नोव्हेंबर रोजी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने प्रत्येकी 15 हजार रुपयांची सुरक्षा ठेव जमा केल्यानंतर जामीन मंजूर करण्यात आला होता. 

अधिक वाचा  : हवेच्या प्रदूषणामुळे श्वास घ्यायला त्रास होतोय?

त्यानंतर एनसीबीने सत्र न्यायालयासमोर याचिका दाखल करून, फिर्यादीचे म्हणणे न ऐकता जामीन मंजूर केल्याचा दावा केला होता.  केंद्रीय एजन्सीने मॅजिस्ट्रेटच्या आदेशाला 'विकृत, बेकायदेशीर आणि कायद्याने वाईट" म्हटलं होतं, जे निर्णय रद्द करण्यास योग्य होता. 14 जून 2020 रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने त्याच्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर मनोरंजन उद्योगात आपली पाळेमुळे घट्ट करणाऱ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला.

याप्रकरणी एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांनाही अटक केली होतं. याशिवाय सारा अली खान, श्रद्धा कपूर यांसारख्या अनेक प्रसिद्ध स्टार्सचीही चौकशी करण्यात आली होती. या क्रमाने भारती सिंग आणि तिचा पती हर्ष यांचीही नावे समोर आली असून त्यांच्या घरावर छापा टाकला असता त्यांच्या घरातून अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी