Bharti Singh : कोरोनाच्या भीतीने भारती सिंगने घर सोडले! गरोदरपणात स्वत:च्या सुरक्षेसाठी उचलले महत्त्वाचे पाऊल

बी टाऊन
Updated Jan 15, 2022 | 17:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bharti Singh : कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळेच भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांनी काही दिवस फार्महाऊसवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. भारती सिंग गरोदर आहे आणि गरोदरपणात स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

Bharti Singh and Haarsh Limbachiyaa shifted to their farmhouse
भारती सिंग लवकरच आई होणार आहे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कोरोनाच्या भीतीने भारती सिंगने घर सोडले
  • मुंबई शहराबाहेरील फार्महाऊसवर जाण्याचा घेतला निर्णय
  • गरोदरपणात स्वत:च्या सुरक्षेसाठी उचलले पाऊल

Bharti Singh and Haarsh Limbachiyaa shifted to their farmhouse :  कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळेच भारती सिंग  (Bharti Singh) आणि हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) यांनी काहीदिवस फार्महाऊसवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. भारती सिंग गरोदर आहे आणि गरोदरपणात स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. भारतीने युट्यूबवरील तिच्या नवीन व्लॉगमध्ये ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे.  ती पती हर्ष लिंबाचियासोबत शहराच्या बाहेरील तिच्या फार्महाऊसवर  (Bharti Singh and Haarsh Limbachiyaa shifted to their farmhouse) आहे.

भारती-हर्ष मुंबईपासून दूर असलेल्या फार्म हाऊसवर पोहोचले

भारती सिंगने युट्यूबवरील तिच्या लेटेस्ट व्लॉगमध्ये चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली आहे. मुंबईत कोरोनाचा धोका खूप वाढल्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे भारतीने सांगितले. त्यामुळे स्वतःला कोरोनापासून वाचवण्यासाठी ते दोघंही त्यांच्या फार्म हाऊसवर पोहोचले आहेत, जिथे ते शूट करून व्लॉग बनवणार आहेत. या व्लॉगमध्ये भारती आणि हर्ष लिंबाचिया यांच्यातली नोक-झोकही पाहायला मिळत आहे. 

भारतीने नवऱ्याची खिल्ली उडवली

भारती हर्षच्या लेखक म्हणून करिअरची खिल्ली उडवताना दिसत आहे. त्याचबरोबर लोकांना उदाहरणे देऊन हर्ष त्यांच्याकडून सर्व कामे कशी करून घेतो हेही सांगितले. 
त्याला गरोदर स्त्रीबद्दल अजिबात वाईट वाटत नाही. व्हिडिओ पाहून असे दिसते की दोघेही एकमेकांची कंपनी एन्जॉय करत आहेत.

चुलीत शिजवले जेवण

व्हिडिओमध्ये भारती आणि हर्ष त्यांच्या पाळीव कुत्र्या गोगोसोबत खेळताना दिसत आहेत. भारतीने रात्रीचे जेवण चुलीत शिजवले. हर्ष चिकन कबाब बेक करताना दिसतो, तर भारतीने दाल मखनी आणि रोटी बनवल्या.


भारती सिंग गरोदरपणाचा आनंद घेत आहे


भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया एप्रिलमध्ये आई-वडील होणार आहेत. भारती इंस्टा वर बेबी बंप दाखवणारी छायाचित्रे देखील शेअर करते. भारती सिंग गरोदरपणाचा आनंद घेत आहे. भारती म्हणते की ती तिच्या डिलेव्हरीच्या ठरलेल्या तारखेपर्यंत काम करणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी