Bhola Advance Booking: अजय देवगणच्या 'भोला' ला भोला समजू नका; प्रदर्शनपूर्वीच केलीय इतक्या कोटीची कमाई

बी टाऊन
Updated Mar 28, 2023 | 08:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bholaa Advance Booking Open: 'दृश्यम' आणि 'दृश्यम 2' मध्ये  धमाकेदार कामगिरी केल्यानंतर, अजय देवगण आणि तब्बूची जोडी आता 'भोला' चित्रपटाद्वारे प्रेक्षकाचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'भोला' चित्रपटाच्या एडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाली असून, प्रेक्षक देखील मोठ्याप्रमाणात या सिनेमाचे प्री- बुकिंग करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

 चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच कोटीची कमाई केली आहे!
'भोला' हा चित्रपट 30 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'भोला हा चित्रपट 30 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
  • मात्र ह्या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच कोटीची कमाई केली आहे!
  • एडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी रचला इतिहास

Hindi Movie Bhola अजय देवगणच्या 'भोला' चित्रपटाने एडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी कोटीचा पल्ला गाठून इतिहास रचला आहे. अजय देवगणच्या या चित्रपटात असे काय खास असणार आहे? आणि तुम्ही 'भोला' हा चित्रपट का पाहावा? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ( Ajay Devgan's 'Bhola' movie earn crore before release)

भोला हा एक तूफान एक्शनपट सिनेमा असून, या चित्रपटाद्वारे अजय देवगण पहिल्यांदाच चित्रपट दिग्दर्शनात उतरत आहे. या चित्रपटात अजय आणि तब्बूची जोडी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करताना दिसणार आहे. यापूर्वीदेखील या जोडीला अनेक चित्रपटांमध्ये चाहत्यांनी भरभरून दाद दिली होती. मग तो त्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'दृश्यम' असो वा 'दृश्यम 2' असो. 'भोला'मध्ये तब्बू पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अजय देवगणची भूमिका थोडी वेगळी असेल. 

अधिक वाचा : ​मुख्यमंत्र्यांची 'राज'भेट, मालेगावात उद्धव ठाकरेंची ललकारी

अजयने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हीडियो शेयर करत चाहत्यांना आवाहन केले आहे की, 'तो तुम्हाला भेटायला येत आहे. तुम्ही तयार आहात का? आत्ताच तुमची तिकिटे बुक करा.' हा चित्रपट 2D, 3D तसेच 4DX आणि IMAX 3D मध्ये रिलीज होणार आहे, असे देखील त्याने पुढे सांगितले.

अधिक वाचा : पुष्पामध्ये नव्हता हिट ठरलेला डायलॉग; श्रेयसनं केला खुलासा

अजय देवगणच्या या पोस्टवर लोकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्याच्या पोस्ट खाली काही मागण्या देखील मांडल्या आहेत.  एका यूजरने लिहिले की, 'सिंघम लवकरच भोलाच्या नव्या अवतारात पाहायला मिळणार आहे.' तर आणखी एका यूजरने \'भोला' ची गाणी रिलीज करण्याची मागणी केली आहे. 

अजय देवगण दिग्दर्शित या सिनेमात एक्शनचा भरपूर मसाला असणार आहे. या चित्रपटातील सर्व एक्शन सिकवेलचे निर्देशन स्वतः अजयनेच केले आहे. अजयचे वडील विरू देवगण यांच्याकडून त्याने एक्शन सिकवेलची ही कला शिकून घेतली. 

अधिक वाचा : ​स्वर्गापेक्षा कमी नाहीत दक्षिण भारतातील हे पर्यटन स्थळं

काल रविवारपासून अजय देवगन, तब्बू आणि दीपक डोबरियाल स्टारर फिल्म 'भोला' च्या एडवान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे, रिपोर्टनुसार, आतापर्यंत चित्रपटाची 50 हजारांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. चित्रपटाच्या तिकीटांचे आगाऊ बुकिंग पाहता अजय देवगणला 'भोला'च्या अवतारात पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रदर्शनानंतर 'भोला' ला बॉक्स ऑफिसवर काय प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

एडवान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या या उदंड प्रतिसादामुळे अजय आणि तब्बू चे चाहते हा सिनेमा पाहण्यासाठी  भरपूर उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा सिनेमा शाहरुख खान आणि दीपिका पडूकोणच्या 'पठाण' चित्रपटाचा विक्रम लवकरच मोडेल अशी लोकांना अपेक्षा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी