IMDb of Dasara & Bholaa : आयएमडीबी वर अजय देवगणच्या 'भोला' ने घेतली आघाडी, 'दसरा' पडला मागे

बी टाऊन
Updated Apr 02, 2023 | 13:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

Dasara Vs Bholaa अजय देवगण आणि तब्बू स्टारर 'भोला' भलेही बॉक्स ऑफिसवर नानी आणि कीर्ती सुरेशच्या 'दसरा' च्या समोर फिका पडला असेल, मात्र IMDb वर त्याने आघाडी घेतली आहे. 

लोकांना बॉलीवूड तडक्यापेक्षा साऊथ इंडियन फ्लेवर जास्त आवडत आहे.    
बॉक्स ऑफिस वर 'भोला' विरुद्ध 'दसरा' आमनेसामने  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जय देवगण आणि तब्बू स्टारर 'भोला' आणि नानी आणि कीर्ती सुरेश स्टारर 'दसरा' आमनेसामने
  • बॉक्स ऑफिसवर 'दसरा' ला अधिक पसंती
  • IMDb वर 'भोला' वरचढ

Dasara Vs Bholaa IMDb Rating  अजय देवगण आणि तब्बू स्टारर 'भोला' या सिनेमासोबत नानी आणि कीर्ती सुरेशचा 'दसरा' हा सिनेमादेखील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला होता. 'दसरा' च्या समोर अजय देवगणच्या 'भोला' ला बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करता आली नाही, मात्र आयएमडीबी (IMDb) वर 'भोला' हा 'दसरा' चित्रपटाच्या वरचढ ठरला आहे. Bhola beats 'Dussehra' on IMDb

या दोन्ही चित्रपटांचे रेटिंग काय आहेत, जाणून घेऊयात. 

अधिक वाचा : रविवार खर्चीक ठरेल की धनलाभाचा; जाणून घ्या राशीभविष्य

काय आहे 'दसरा' ची रेटिंग-

नानी आणि कीर्ती सुरेश ची फिल्म 'दसरा' ला आयएमडीबी वर 8.0 ची रेटिंग मिळाली आहे. हे रेटिंग अनुक्रमे 3.2 हजार वोट्सच्या आधारावर ठरवण्यात आले आहे. ज्यामध्ये 67.7 % युजर्सनी या चित्रपटाला 10 रेटिंग, 10.3% लोकांनी 9 रेटिंग, 6.0% युजर्सनी 2 रेटिंग आणि 0.6% लोकांनी 1 रेटिंग दिले आहेत. एकंदरीत या चित्रपटाची सरासरी रेटिंग 8.0 एवढी झाली आहे. 

'भोला' ने टाकले 'दसरा' ला मागे

हेच जर अजय देवगणच्या 'भोला' चित्रपटाबद्दल बोलायला गेले तर या सिनेमाने 'दसरा' ला मागे टाकले आहे. चित्रपटाची सरासरी रेटिंग 8.1 आहे, जी 9.9 हजार वोट्स च्या आधारावर ठरवण्यात आली आहे. सिनेमाला 53.3% युजर्स ने 10 रेटिंग, 31.0% युजर्स ने 9 रेटिंग, 5.6% युजर्स ने 8 रेटिंग, 0.6% युजर्स ने 2 रेटिंग आणि 4.4% युजर्स ने 1 रेटिंग दिली आहे. यानुसार 'भोला' ची सरासरी रेटिंग 8.1 अशी बनते. 

अधिक वाचा : ​PBKS vs KKR : पंजाबने मोहाली जिंकली, कोलकाताचा पराभव

किती झाले कलेक्शन ?

दोन्ही सिनेमाचे सरासरी कलेक्शन बघायला गेलो तर दोन दिवसात 'भोला' ने जवळपास 18 करोड चे कलेक्शन केले होते, तर दुसरीकडे 'दसरा' ने त्याहून दुप्पट कमाई केली आहे. 'दसरा' चित्रपटाची दोन दिवसाची कमाई 35 करोड इतकी आहे. यानुसार, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले की, लोकांना बॉलीवूड तडक्यापेक्षा साऊथ इंडियन फ्लेवर जास्त आवडत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी