Bholaa Box Office Day 1 Prediction: 'भोला' ची खराब सुरुवात, राम नवमीची सुट्टी असूनदेखील ओपनिंग डे ला थिएटरखाली

बी टाऊन
Updated Mar 31, 2023 | 13:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bholaa Box Office Day 1 Prediction: 'भोला' ची बेकार सुरुवात, राम नवमीची सुट्टी असूनदेखील ओपनिंग डे ला सिनेमागृह खाली  सिनेमागृहात नुकताच प्रदर्शित झालेला 'भोला' बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकलेला नाही. काही राज्यात राम नवमीची सुट्टी असून देखील अजय देवगण च्या या सिनेमाला अपेक्षेहून कमी प्रतिसाद मिळाला. चित्रपटाच्या आगाऊ तिकीट बुकिंगच्या तुलनेमध्ये, ओपनिंगला देखील चांगले कमावता आले नाही. 

बॉक्स ऑफिसवर 'भोला' ची खराब सुरवात
bholaa box office day 1 prediction ajay devgn film gets very low opening   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'भोला' च्या पदरी ओपनिंगला निराशा, मॉर्निंग शोमध्ये चित्रपट गृहातील 90% खुर्च्या रिकाम्याच. 
  • 'भोला' च्या आगाऊ बुकिंगमधून ही होऊ शकली नाही अपेक्षित कमाई      
  • राम नवमीच्या सुट्टीचा फायदा 'भोला' सिनेमाला मिळाला नाही, विकेंडपर्यंत हीच परिस्थिती राहिल्यास होऊ शकतो फ्लॉप

Bhola First Day अजय देवगण आणि तब्बू स्टारर 'भोला' ची बॉक्स ऑफिस सुरुवात इतकी खास झाली नाही आहे. राम नवमीच्या मुहूर्तावर गुरुवारी 30 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या ह्या सिनेमाला, सुट्टीचा फायदा मिळालेला नाही. सकाळच्या सर्व शोमधील सिनेमघरातील 100 पैकी 90 खुर्च्या या खालीच दिसून आल्या. तत्पूर्वी 'भोला' ची आगाऊ बुकिंगने देखील अपेक्षित अशी कमाई करून दिली नव्हती, त्यामुळे आता पहिल्याच दिवशी चित्रपटाच्या कमाईचा ग्राफ कमी झालेला दिसून आला. मात्र, दुपारनंतर आणि रात्रीच्या शो साठी प्रेक्षकांची गर्दी वाढल्यास या सिनेमाच्या तिजोरीत थोडी फार कमाई होऊ शकते. मात्र, पहिल्याच दिवसाची ही परिस्थिती पाहता 'भोला' ची सुरुवात हवी तितकी चांगली झाली नाही,  असे बोलता येऊ शकते. 

अधिक वाचा : ​Akshay Kumar : अक्षय कुमार 'मर्दोंवाले प्रॉडक्ट' लाँच करणार

 'भोला' देशभरात जवळपास 4000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. अजय देवगण दिग्दर्शित हा सिनेमा तमिळ चित्रपट 'कैथी' चा रिमेक आहे. चित्रपटाच्या अॅक्शन सीन्सवर प्रचंड मेहनत घेण्यात आली आहे, तसे तो भव्यदिव्य बनवण्यात आला आहे यात काही शंका नाही. मात्र, या चित्रपटाची पटकथा भावनेच्या पातळीवर थोडी कमकुवत ठरते. या सिनेमाच्या ओपनिंगला देशातील युपी, राजस्थान आणि मध्य प्रदेश सारख्या अनेक भागात रामनवमीची सुट्टी असल्यामुळे 'भोला'ला दमदार ओपनिंग मिळेल अशी अपेक्षा होती, पण तसे होऊ शकले नाही.

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ही 'भोला' ला कमी प्रतिसाद

Bholaa Box Office : महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये 'भोला'ची पहिल्या दिवसाची सुरुवात इतकी खास झाली नाही.  गुरुवारी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांची संख्या महामारीच्या तुलनेमध्ये ही खूपच कमी आहे. मात्र, या चित्रपटाला ४ दिवसांचा विकेंड लाभणार आहे. त्यामुळे,  शनिवार आणि रविवारी कमाई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे, बॉक्स ऑफिसवर भलेही 'भोला' ने संथ सुरुवात केली असली तरी हा सिनेमा पूर्णपणे फ्लॉप होणार असे भविष्य तूर्तास करता येणारे नाही. 

अधिक वाचा : ​Ponniyin Selvan 2 ऐश्वर्या रायच्या 'पोन्नियिन सेल्वन 2' चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, सिंहासनासाठी सुरू झालेल्या महायुद्धाचा बिगूल आणणार अंगावर काटे!

'भोला'ने आगाऊ बुकिंगमधून केवळ 2 कोटींची कमाई केली

Bholaa Advance Booking: 'भोला' साऊथ चा सिनेमाचा रिमेक आहे. अजय देवगणचा 'दृश्यम 2' हा देखील साऊथचा रिमेक होता. मात्र असे असतानाही दृश्यम चित्रपटाने 200 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला. पण 'भोला'चे भविष्य सध्या फारसे चांगले दिसत नाही. निर्मात्यांनी 11 दिवसांपूर्वीच चित्रपटाची आगाऊ बुकिंग सुरू केली होती. मात्र, प्रदर्शनापूर्वीच्या आगाऊ बुकिंगमधून त्याने  2-2.25 कोटी रुपये कमाई केली आहे. तर 'दृश्यम 2' ने 6.5 कोटी रुपयांची आगाऊ बुकिंग केली होती.  

रामनवमीची सुट्टी आणि अजय देवगणच्या स्टारडममुळे पहिल्या दिवशी चित्रपट 13-15 कोटींची कमाई करेल अशी अपेक्षा होती. मात्र आता कमाईचा आलेख यापेक्षा कमी होणार असल्याचे दिसून येत आहे.  

सिंगल स्क्रीन थिएटर्सवर 'भोला'चे भवितव्य अवलंबून आहे

Bholaa Budget : 'भोला'चे बजेट 100 कोटी रुपये इतके आहे. त्यामुळे हा चित्रपट हिट होण्यासाठी मेकर्सना खूप प्रयत्न करावे लागतील. याचे पहिले कारण म्हणजे, 'भोला' हा संपूर्ण हाय-ऑक्टेन अॅक्शन फिल्म असल्याकरणामुळे तो सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये अधिक टाळ्या मिळवू शकतो. या गोष्टीमुळे हा चित्रपट मल्टिप्लेक्सच्या प्रेक्षकांपासून थोडा वेगळा होतो, ज्याचा थेट परिणाम चित्रपटाच्या कमाईवर होतो. दुसरे कारण म्हणजे, तमिळ चित्रपट 'कैथी' आधीपासूनच OTT वर हिंदी आवृत्तीत उपलब्ध आहे. त्यामुळे, अनेक हिंदी प्रेक्षकांनी तो आधीच पाहिला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी