Bhool bhulaiyaa 2 : या वर्षात 100 कोटी क्लबमध्ये सामील होणारा 'भूल भुलैया 2' हा 5वा चित्रपट, पाहा संपूर्ण यादी

बी टाऊन
Updated May 27, 2022 | 22:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bhool bhulaiyaa 2 : 'भूल भुलैया 2' हा चित्रपट येत्या 1-2 दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार करेल. 2022 मध्ये बॉक्स ऑफिसवर कोणत्या चित्रपटांनी 100 कोटींहून अधिक व्यवसाय केला आहे ते जाणून घेऊया.

'Bhool Bhulaiya 2' is the 5th film to join the 100 crore club in 2022
भूल भुलैया 2 लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भूल भुलैया 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार
  • 2022 मध्ये 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा 5वा सिनेमा
  • आतापर्यंत 92.05 कोटींचा व्यवसाय या सिनेमाने केला आहे.

Bhool bhulaiyaa 2 : 'भूल भुलैया 2' हा चित्रपट येत्या 1-2 दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार करेल.  2022 मध्ये बॉक्स ऑफिसवर कोणत्या चित्रपटांनी 100 कोटींहून अधिक व्यवसाय केला आहे ते जाणून घेऊया

2022 मध्ये 100 कोटी क्लबमध्ये सामील होणारे सिनेमा


कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा 'भूल भुलैया 2' हा चित्रपट शुक्रवारी 20 मे रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. या चित्रपटाने आतापर्यंत 92 कोटींहून अधिकच व्यवसाय केला आहे. येत्या 1-2 दिवसांत हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा पार करेल. 2022 मध्ये बॉक्स ऑफिसवर कोणत्या चित्रपटांनी 100 कोटींहून अधिक व्यवसाय केला आहे ते जाणून घेऊया.

Bhool Bhulaiyaa 2 trailer: Kartik Aaryan and Kiara Advani promise a spookfest this May | Hindi Movie News - Times of India

भूल भुलैया 2

अनीस बज्मी दिग्दर्शित कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर 'भूल भुलैया 2' लोकांना खूप आवडला आहे. या चित्रपटाने गुरुवारी रिलीजच्या सातव्या दिवशी 7.27 कोटींची कमाई केली आहे. अशा प्रकारे या चित्रपटाने आतापर्यंत एकूण ९२.०५ रुपयांचा व्यवसाय केला आहे.

Alia Bhatt's 'Gangubai Kathiawadi' and 'RRR' will release in theatres and not OTT, confirms producer Jayantilal Gada | Hindi Movie News - Times of India


गंगूबाई काठियावाड़ी


संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित होता. सिनेमात मुंबईतील कामाठीपुरा परिसर दाखवण्यात आला आहे. 25 फेब्रुवारीला रिलीज झालेल्या या चित्रपटाने 123 कोटींची कमाई केली होती.

The Kashmir Files: IMDb detects 'unusual voting activity' and applies alternate rating; director Vivek Agnihotri calls it 'unethical' | Hindi Movie News - Times of India

द कश्मीर फाइल्स

अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती स्टारर 'द काश्मीर फाइल्स' 11 मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. काश्मिरी पंडितांवर होणारे अत्याचार या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटाने 250 कोटींचा व्यवसाय केला.

RRR' release date announced! Ram Charan, Alia Bhatt, Jr NTR and Ajay Devgn's magnum opus blocks two dates | Hindi Movie News - Times of India

आरआरआर

साउथ स्टार्स राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांचा 'आरआरआर' चित्रपट लोकांना खूप आवडला. एसएस राजामौली यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने हिंदीत चांगलीच कमाई केली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर हिंदीमध्ये 277 कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट 25 मार्च रोजी रिलीज झाला होता.

KGF Chapter 2 official release date is here! | Tamil Movie News - Times of India

केजीएफ 2

साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार यशचा चित्रपट 'KGF 2' ने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम केले आहेत. प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटाने हिंदी बॉक्स ऑफिसवर 433 रुपयांचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट 14 एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी