Bhool Bhulaiyaa 2: अक्षयच्या ‘भूल भुलैय्या’च्या सिक्वेलमध्ये कार्तिक आर्यनची वर्णी, फर्स्ट लूक पोस्टर रिलीज

बी टाऊन
Updated Aug 19, 2019 | 15:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

१३ वर्षांपूर्वी रिलीज झालेला सुपरनॅचरल थ्रीलर भूल भुलैय्या सिनेमा गाजला होता. अक्षय कुमार-विद्या बालनच्या या सिनेमाचा आता सिक्वेलचा फर्स्ट लूक रिलीज झालाय. यंदा सिनेमाच्या दुसऱ्या भागात दिसणार आहे कार्तिक आर्यन

bhoolbhulaiyaa 2 first look poster out kartik Aryan recreates akshay kumar’s pose
Bhool Bhulaiyaa 2: अक्षयच्या ‘भूल भुलैय्या’च्या सिक्वेलमध्ये कार्तिक आर्यनची वर्णी, फर्स्ट लूक पोस्टर रिलीज  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • १३ वर्षांनंतर 'भूल भुलैय्या' सिनेमाचा सिक्वेल 'भूल भुलैय्या २' येतोय
  • अक्षय कुमारच्या जागी सिनेमात झळकणार युथ क्रश कार्तिक आर्यन
  • फर्स्ट लूक पोस्टर रिलीज, सिनेमा मात्र ३१ जुलै २०२० रोजी भेटीला

मुंबई: १९९३ साली रिलीज झालेल्या मळ्यालम सिनेमा मनीचित्रथाझु रिमेक असलेला, अक्षय कुमार-विद्या बालनच्या मुख्य भूमिकांनी नटलेला भूल भुलैय्या सिनेमा १३ वर्षांपूर्वी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. सिनेमाने भलतीच प्रसिद्धी मिळवली. एका कॉमेडी पद्धतीत बराच गहन विषय हाताळला गेला. विद्याच्या मोंजोलिका भूमिकेने तर सिनेमाला चार चाँद लावले. गेले अनेक दिवस या सिनेमाच्या सिक्वेलची चर्चा रंगली होती. अखेर या दुसऱ्या भागाचं पहिलं-वहिलं पोस्टर रिलीज केलं गेलं आहे. यंदा या सिक्वेलमध्ये म्हणजेज भूल भुलैय्या २ मध्ये अक्षयच्या जागी दिसणार आहे युथ क्रश असलेला अभिनेता कार्तिक आर्यन.

कार्तिक आर्यनचा सिनेमातल्या लूकचे दोन पोस्टर्स भेटीला आले आहेत आणि त्या दोन्ही पोस्टर्समध्ये कार्तिक अक्षयचा लूक रिक्रियेट करताना दिसतो. अक्षयने दिलेली पोझ आणि तसेच कपडे घालून सिनेमातला कार्तिकचा लूक रिव्हील केला गेलाय. तसंच पोस्टरवर ठळक अक्षरात लिहीलं गेलं आहे, '१३ साल बाद... द हॉन्टिंग कॉमेडी रिटर्न्स...’ तर सिनेमाचं अजून एक पोस्टर रिलीज केलं गेलंय ज्यामध्ये कार्तिक भायनक हाडाच्या खोपड्यांवर हातात हाडाचा हात घेऊन झोपलेला दिसतो. दोन्ही पोस्टर सध्या सोशल मीडियावर बरेच गाजत आहेत. सिनेमाचं मोशन पोस्टर सुद्धा भेटीला आलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Teri Aankhein Bhool Bhulaiyaa Baatein hai Bhool Bhulaiyaa ? #BhoolBhulaiyaa2 ?✌???

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

सिनेमाच्या पहिल्या भागात अक्षयच्या भूमिकेने बरीच वाह-वाह मिळवली होती. तर विद्याच्या भूमकेची सुद्धा बरीच प्रशंसा झाली होती. तसंच सिनेमातल्या इतर कॅरेक्टर रोलमध्ये असलेल्या सगळ्याच कलाकारांनी कमाल केली होती. सिनेमाची कथा, त्याचा क्लायमॅक्स आणि मोंजोलिकाचं रहस्य या सर्वांनी सिनेमाचं थ्रील अगदी छान रेखाटलं गेलं होतं. तिच कमाल आता हा दुसरा भाग करु शकेल का? त्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्याशिवाय सिनेमात कार्तिकच्या अपोझिट कुठल्या अभिनेत्रीला कास्ट केलं जाणार हे अद्यापतरी गुलदस्त्यात आहे. बॉलिवूडच्या नवीन जेनरेशनचा कार्तिक सिनेमात दिसणार म्हणजे याच नवीन जेनरेशनपैकी जान्हवी कपूर, सारा अली खान आणि अनन्या पांडे यांची नावं चर्चेत आहेत. तसंच जिथे पहिला भाग संपला तिथेच दुसरा भाग सुरु होत ही कथा पुढे सरकेल की सिनेमात अजून काही नवीन पहायला मिळेल हे सुद्धा अद्याप तरी कळू शकलेलं नाहीये.

सिनेमाचं फर्स्ट लूक पोस्टर सिनेमाचे निर्माता भूषण कुमार यांनी नुकतंच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलं. तसंच कार्तिकने सुद्धा त्याच्या सोशल मीडियावरुन त्याचा हा फर्स्ट लूक शेअर केला. सिनेमाच्या या पहिल्या लूकने बऱ्याच चर्चांना उधाण आलं आहे. त्याशिवाय सिनेमाबद्दलची उत्सुकता सुद्धा ताणली गेली आहे. तरी प्रेक्षकांना सिनेमासाठी थोडी वाट पहावी लागणार आहे कारण अनीस बाझ्मी द्वारा दिग्दर्शित हा सिनेमा ३१ जुलै २०२० रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...