पाहा हॅक झालेलं ट्विटर अकाऊंट पूर्ववत होताच काय होतं बिग बी अमिताभ यांचं पहिलं ट्विट

बी टाऊन
Updated Jun 11, 2019 | 20:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Big B Amitabh is active on Twitter again: अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट नुकतंच हॅक झालं होतं. त्यानंतर सायबर क्राईम सेलनं कारवाई करून लगेच ते पूर्ववत केलं. त्यानंतर हे होतं बिग बींचं पहिलं ट्विट.

Big B Amitabh first tweet after hacked Twitter account gets recovered
पाहा हॅक झालेलं ट्विटर अकाऊंट पूर्ववत होताच काय होतं बिग बी अमिताभ यांचं पहिलं ट्विट  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: महानायक अमिताभ बच्चन कायम सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. मग ते इंस्टाग्राम असो किंवा ट्विटर किंवा फेसबुक सुद्धा, कायम ते काहीतरी शेअर करताना, त्यांच्या फॅन्ससी संवाद साधताना दिसतात. त्यांच्या ट्विटरवर तर तब्बल 37.7 मिलियन फॉलोवर्स आहेत. हेच त्यांचं ट्विटर अकाऊंट सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हॅक केलं गेलं. अकाऊंट हॅक होताच त्यांचा प्रोफाईल फोटो बदलून पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो अपलोड केला गेला. पण सायबर सेलने लगेच यावर कारवाई करत 24 तासातंच बिग बी यांचं अकाऊंट पूर्ववत केलं. अकाऊंट रिकव्हर होताच बिग बी हे पुन्हा एकदा ट्विटरवर पूर्वी सारखेच अॅक्टीव्ह झालेले दिसले. त्यांनी गहन अर्थ असलेलं पहिलं ट्विट शेअर केलं.

त्यांच्या या पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं, ‘सिर्फ शब्दों से न करना, किसी के वजूद की पहचान...हर कोई , उतना कह नही पाता...जितना समझता और महसूस करता है...’ असं लिहिताच त्यांच्या फॉलोवर्सने यावर बऱ्याच कमेन्ट करत या सायबर हल्ल्याची निंदा केली. त्याचसोबत त्यांच्यावर असलेलं त्यांच्या चाहत्यांचं प्रेम सुद्धा या कमेन्ट्समधून पाहायला मिळालं. बिग बी यांची ट्विट करण्याची एक वेगळी स्टाईल आहे. ते त्यांच्या प्रत्येक ट्विटच्या आधी T हे इंग्रजी अक्षर लिहितात एक नंबर लिहितात आणि मग ट्विट करतात. हे ते त्यांच्या प्रत्येक सोशल मीडियाच्या पोस्ट बद्दल ते करताना दिसतात. त्यामुळे हे असं ट्विट करताच त्यांच्या फोलोवर्सना कळलं की आता बिग बी हे पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाले आहेत आणि त्यांचं अकाऊंट सुद्धा पूर्ववत झालं आहे.

या रिकव्हर झालेल्या ट्विटर अकाऊंटवरच्या पहिल्या ट्विटनंतर लगेच बिग बी यांनी अजून एक ट्विट सुद्धा केलं ज्याचं कॅप्शन पहिल्या ट्विटच होतं. पण यावेळी फोटो वेगळा होता. त्यानंतर बिग बी पुन्हा एकदा ट्विटरवर अॅक्टिव्ह झालेले दिसले. हा सायबर हल्ला होताच एका टर्किश फुटबॉलरसाठी लढा करत असल्याचं या सायबर हॅकर्सच म्हणणं होतं. तसं त्यांनी बिग बी यांच्या अकाऊंटवरून ट्विट केलं होतं. शिवाय त्यांनी बिग बी यांच्या अकाऊंटवरचा बायोसुद्धा बदलला होता आणि लिहिलं होतं की, ‘अक्टर, असो असं अजून काही लोकांचं असं म्हणणं आहे, पाकिस्तानला प्रेम’, पुढे त्यांनी त्यांचा लोगो सुद्धा शेअर केला होता आणि यानंतर एक मोठा सायबर हल्ला होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे या सगळ्यावर आता काय कारवाई होते त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
पाहा हॅक झालेलं ट्विटर अकाऊंट पूर्ववत होताच काय होतं बिग बी अमिताभ यांचं पहिलं ट्विट Description: Big B Amitabh is active on Twitter again: अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट नुकतंच हॅक झालं होतं. त्यानंतर सायबर क्राईम सेलनं कारवाई करून लगेच ते पूर्ववत केलं. त्यानंतर हे होतं बिग बींचं पहिलं ट्विट.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles