Big B living with 25% Liver: पंचहात्तरीतल्या फीट असलेल्या बिग बी अमिताभ यांचं ७५ टक्के यकृत निकामी

बी टाऊन
Updated Aug 20, 2019 | 13:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

बिग बी अमिताभ बच्चन यांनी नुकताच एका कार्यक्रमात त्यांच्या प्रकृतीबद्दल एक खुलासा केला आहे. ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. बिग बी यांनी त्यांचं यकृत फक्त २५ टक्के सुरु आहे असं म्हटलं आहे.

big b amitabh opens up about his lever being 75 percent damaged
Big B living with 25% Liver: पंचहात्तरीतल्या फीट असलेल्या बिग बी अमिताभ यांचं ७५ टक्के यकृत निकामी 

थोडं पण कामाचं

  • बिग बी अमिताभ यांचा अचंबित करणारा खुलासा
  • "माझं ७५ टक्के यकृत गेलं आहे, मी फक्त २५ टक्क्यावर जिवंत आहे...”- अमिताभ बच्चन
  • टीबी होऊनपण ८ वर्ष लागला नव्हता पत्ता

मुंबई: मेगास्टार अमिताभ बच्चन आता पुन्हा एकदा हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकांना करोडपती बनवण्यासाठी सज्ज झाले आहेत. कारण ते होस्ट करत असलेला लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती ११व्या सीझनसह परतला आहे. हॉट सीट समोर बसलेले ७६ वर्षांचे बिग बी आजही तितकेच फीट आणि डॅशिंग दिसतात. आजही ते त्यांच्या कामात सतत व्यस्त असतात पण तब्येतीची सुद्धा तितकीच काळजी घेताना दिसतात. अशीच तब्येतीची काळजी घेण्याबद्दल एका हेल्थ कार्यक्रमात त्यांनी स्वतःबद्दल एक खुलासा केला. या हेल्थ कार्यक्रमात त्यांना पाहुणे म्हणून बोलावलं असता त्यांनी स्वतःच्या तब्येतीबद्दल एक गोष्ट सांगितली आणि सगळेच अचंबित झाले. त्यांचा हा खुलासा खरंच आश्चर्याचा झटका देणारा ठरला.

रेग्यूलर चेकअपवर प्रकाश टाकताना बिग बी म्हणाले, “मी कायम माझ्या वैयक्तिक अनुभवाचं उदाहरण देत स्वतःच्या तब्येतीबद्दल माहिती घेणं किती महत्त्वाचं आहे हे पटवून देत असतो... सगळ्यांसमोर सांगायला मला काहीच हरकत वाटत नाही की मी टीबीमधून वाचलो आहे, हेपेटाईटस बीमधून वाचलो आहे, बॅड ब्लड इन्फ्युझन झालं होतं आणि माझं ७५ टक्के यकृत निकामी आहे... पण कारण मी वेळेत याचा शोध लावू शकलो म्हणून आज तब्बल २० वर्षांनी सुद्धा, जेव्हा माझं ७५ टक्के यकृत गेलं आहे, मी फक्त २५ टक्क्यावर जिवंत आहे...”

 

 

 

 

बिग बी हे सांगत सगळ्यांना हे सांगून आपल्या तब्येतीची योग्य काळजी कशी घ्यावी आणि कसं वेळच्या वेळी चेकअप करणं गरजेचं असल्याचं महत्त्व पटवून देत होते. पुढे त्यांनी त्यांच्या तब्येतीच्या बाबतीतल्या कठीण काळातील अधिक काही गोष्टींचा खुलासा केला आणि ते म्हणाले, “मला टीबी झाला होता पण मला ८ वर्ष कळलंच नाही... मी कायम म्हणतो की माझ्याप्रमाणे हे कोणासोबत ही घडू शकतं... त्यामुळे जर तुम्ही याचं निदान योग्य वेळेत केलं नाही तर मग तुम्हाला वेळेत ते कळणार नाही आणि मग त्यावर उपचार देखील करता येणार नाही...”

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Colourful at work .. too much colour happening .. the blues first and now the reds and ‘santara’??

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

 

बिग बी यांनी हे सांगत एक खूप गहन मुद्दा अधोरेखीत केलं. या वयात देखील यकृत फक्त २५ टक्के असताना बिग बी स्वतःला फीट ठेवतात हे विशेष. कायम कामात व्यस्त असणारे बिग बी आजही तब्येतीची काळजी घेत आपलं स्वास्थ्य टिकवून आहेत. एवढंच काय तर या वयात सुद्धा ते कामाच्या वेळा पाळत तब्येतीची सुद्धा काळजी घेत दोघांचा बॅलेन्स उत्तम साधताना दिसतात. त्यांच्याकडे बघून वाटणार सुद्धा नाही की हा माणूस फक्त २५ टक्के यकृतावर जिवंत आहे. तब्येतीची काळजी घेणं आणि योग्य वेळेत निदान होणं हे सगळं कसं आणि किती महत्त्वाचं आहे हे नक्कीच यावरुन सिद्ध होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...