अमिताभने शेअर केला ऐतिहासिक फोटो

बॉलिवूडचा शहेनशहा अशी ओळख मिरवणाऱ्या अमिताभ बच्चनने इन्स्टाग्रामवर ६०च्या दशकातील एक ऐतिहासिक फोटो शेअर केला. यात बॉलिवूडचे दिग्गज दिसत आहेत.

Big B shares throwback picture with Shatrughan Sinha, more 60s legends in single frame
अमिताभने शेअर केला ऐतिहासिक फोटो 

थोडं पण कामाचं

  • अमिताभने शेअर केला ऐतिहासिक फोटो
  • इन्स्टाग्रामवर शेअर केला फोटो
  • फोटोत बॉलिवूडचे ६०च्या दशकातील दिग्गज कलाकार

मुंबईः बॉलिवूडचा शहेनशहा अशी ओळख मिरवणाऱ्या अमिताभ बच्चनने इन्स्टाग्रामवर ६०च्या दशकातील एक ऐतिहासिक फोटो शेअर केला. यात बॉलिवूडचे दिग्गज दिसत आहेत. फोटोत धर्मेंद्र, प्रेम चोप्रा, शत्रुघ्न सिन्हा, अमिताभ बच्चन, जितेंद्र हे कलाकार दिसत आहेत. एकाच फोटोत ६०च्या दशकातील बॉलिवूडचे अनेक दिग्गज दिसत असल्यामुळे या फोटोला अनेकांनी लाइक केले. हा फोटो व्हायरल होत आहे. Big B shares throwback picture with Shatrughan Sinha, more 60s legends in single frame

व्हायरल होत असलेला फोटो अमिताभ तरुण असतानाच्या काळातील आहे. एका पार्टीत बॉलिवूडचे दिग्गज कलाकार निवांतपणे एकमेकांशी बोलत असताना फोटोग्राफरने तो क्षण कॅमेऱ्यात टिपला. हल्ली बॉलिवूडचे दिग्गज या पद्धतीने निवांतपणे गप्पा मारत असल्याचे बघणे हीच दुर्मिळ बाब झाली आहे. यामुळे हा फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे. 

अमिताभने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना जितेंद्र... धर्मेंद्र... प्रेम चोप्रा... शत्रुघ्न सिन्हा.. आणि मी... हल्ली असा निवांत योग जुळून येणे हीच दुर्मिळ बाब आहे; अशा स्वरुपाचे मत व्यक्त केले. 

अमिताभने शेअर केलेला फोटो अवघ्या काही तासांत लाखो लोकांनी बघितला, लाइक केला, शेअर केला. सर्व दिग्गज एका चौकटीत.... बॉलिवूडचे सुवर्णक्षण.... सोनेरी आठवणी... अविस्मरणीय प्रसंग... अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया हा फोटो बघून चाहत्यांनी व्यक्त केल्या. सध्या अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. लवकरच तो चेहरे, ब्रह्मास्त्र, गुडबाय, मे डे आणि जलसा या सिनेमांमध्ये दिसेल. बिझी शेड्युल्डमधून वेळ काढून अमिताभने शेअर केलेल्या फोटोचे चाहते कौतुक करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी