Big Boss Marathi New season : बिग बॉस मराठीचा सीझन 4 लवकरच येणार भेटीला, कोण कोण असणार नव्या सीझनचे स्पर्धक?

बी टाऊन
Updated Jul 24, 2022 | 23:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

Big Boss Marathi Season 4 : बिग बॉस मराठीचा सीझन 4 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या शोचा टीझर लाँच करण्यात आला. आता या सीझनमध्ये कोण कोण कलाकार असणार याचीच उत्सुकता असेल.

Big boss marathi season 4 teaser launch
बिग बॉस मराठीचा 4 था सीझन लवकरच येणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बिग बॉस मराठीचा 4 था सीझन लवकरच भेटीला येणार
  • नव्या सीझनमध्ये कोण कोण स्पर्धक असणार?
  • पुन्हा एकदा महेश मांजरेकरांची शाळा भरणार?

Big Boss Marathi Season 4 : बिग बॉस मराठीचा ( Big Boss Marathi ) नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आधीच्या 3 सीझनप्रमाणेच या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. आता या सीझनमध्ये कोण सेलिब्रिटी स्पर्धक असणार याचीच साऱ्यांना उत्सुकता आहे. मराठी सिनेसृष्टीतील आणि मालिकांमध्ये 
स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या या कलाकारांची नावं सध्या चर्चेत आहेत. कोण आहेत हे कलाकार पाहा. ( Big boss marathi season 4 teaser launch )

Who is Akshaya missing? - Times of India


सगळ्यात पहिलं नाव चर्चेत आहे ते स्मॉल स्क्रीनवरील पाठक बाईंचं अर्थातच अक्षया देवधरचं. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून अक्षया देवधर घराघरात पोहोचली. स्मॉल स्क्रीनवर स्वत:चा वेगळा ठसा अक्षयाने उमटवलाय. 

Chinmay Udgirkar: I am excited to watch my film in theatre with friends | Marathi Movie News - Times of India
तर मालिका, नाटक यातून घराघरात पोहोचलेलं आणखी एक नाव म्हणजे चिन्मय उदगीरकर

Kiran Mane: Latest News, Videos and Photos of Kiran Mane | Times of India


मुलगी झाली हो मालिकेतून आणि कॉन्ट्रोव्हर्सीमुळे चर्चेत आलेलं नाव आहे अभिनेता किरण माने यांचं. 

Exclusive: Nishigandha Wad: I am not homophobic. My words are being misconstrued | Marathi Movie News - Times of India

मराठी सिनेसृष्टी आणि नाटयसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे डॉ. निशीगंधा वाड. निशिगंधा वाड यांचंही नाव बिग बॉसच्या सीझन 4 साठी चर्चेत आहे. दरम्यान, निशिगंधा वाड यांची एक मुलाखत खूपच चर्चेत आली होती. समलैंगिक संबंधांसंदर्भात आपली भूमिका त्यांनी एका मुलाखतीत मांडली होती.त्यानंतर फेसबुकवर त्यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी माफीही मागितली होती. 

Mitali Mayekar defines elegance and grace in traditional attire, see pic | Marathi Movie News - Times of India

तर नाटक, वेबसीरिज, मराठी मालिका, सिनेमा अशा मनोरंजनाच्या सगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये लीलया वावरणारी अभिनेत्री मिताली मयेकर. मितालीचं नावंही बिग बॉसच्या नव्या सीझनसाठी चर्चेत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी