Pushpa-2 बाबत एक मोठी अपडेट आली समोर, जाणून घ्या नेमकी बातमी

Pushpa 2 allu arjun and rashmika mandanna: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या पुष्पा या सिनेमाने गेल्या वर्षी अनेक विक्रम मोडले आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. आता लवकरच याचा सिक्वेल देखील येणार आहे.

big update related to pushpa 2 has come out know what is it allu arjun rashmika mandanna
Pushpa-2 बाबत एक मोठी अपडेट आली समोर, जाणून घ्या नेमकी बातमी  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • पुष्पा-2 च्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत
  • मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिसेंबरमध्ये पुष्पाचा सिक्वेल प्रदर्शित होईल
  • पुष्पा 2 च्या शूटिंगपूर्वी निर्मात्यांनी ठेवली होती खास पूजा

Pushpa 2: चेन्नई: सुपरस्टार अल्लू अर्जुन (allu arjun) आणि रश्मिका मंदानाचा (rashmika mandanna) सिनेमा पुष्पा (Pushpa) मागील वर्षातील ब्लॉकबस्टर हिट होता. पुष्पामधील आयकॉनिक डायलॉग्स आज देखील लोकांना तोंडपाठ आहेत. नुकतंच अल्लू अर्जुनने न्यूयॉर्कमध्ये 'पुष्पा'मधील आयकॉनिक मूव्ह देखील केला होता. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. चाहते आता पुष्पाच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत. (big update related to pushpa 2 has come out know what is it allu arjun rashmika mandanna)

पुष्पाच्या सीक्वेलबाबत आता एक मोठी बातमी समोर आली आहे. हैदराबादमध्ये पुष्पाच्या सीक्वेलची सुरुवात करण्याआधी एक पूजा ठेवण्यात आली होती. या पुजेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेकर्सने मागील वर्षी 2021 मध्ये पुष्पा पार्ट-1 रिलीज केला होता. रिपोर्ट्सनुसार पुष्पाचा सिक्वेल 2022 मध्ये रिलीज होणार आहे.

अधिक वाचा: अनुराग कश्यपची मुलगी आलिया का आहे प्रसिद्ध?

पुष्पा-2 डिसेंबर 2022 मध्ये रिलीज होणार?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुष्पा- 2 सिनेमाशी निगडित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकतंच या चित्रपटाच्या मुहूर्तासाठी एक खास पूजा आयोजित करण्यात आलेली होती. या चित्रपटाचे शूटिंग अद्याप सुरू झालेले नाही. चित्रपटाचे शूटिंग कधी सुरु होणार हे निर्मात्यांनी अद्याप तरी ठरवलेले नाही. कारण या पुष्पाच्या सिक्वेल बाबत अनेक गोष्टींवर चर्चा होणे बाकी आहे. या गोष्टी पूर्ण झाल्यानंतरच चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे शूटिंग 15 सप्टेंबरनंतर सुरू होण्याची शक्यता आहे.

'पुष्पा द रुल' हा सिक्वेल डिसेंबर 2022 मध्ये रिलीज होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुष्पा द राईजचे हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. ज्याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले होते. हा चित्रपट गेल्या वर्षी 17 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने सर्व बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले होते. अभिनेता अल्लू अर्जुनने या चित्रपटात पुष्पाराजची भूमिका साकारली होती. तर रश्मिका मंदानाने श्रीवल्लीची प्रमुख भूमिका साकारली होती. याशिवाय फहाद फासिलही मुख्य भूमिकेत दिसला होता.

अधिक वाचा: सोनाली फोगाटची बलात्कार करुन हत्या झाली?

सध्या अल्लू अर्जुन त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचवेळी रश्मिका मंदान्ना तिच्या बॉलिवूड चित्रपटांवर लक्ष केंद्रित करत असल्याचं समजतं आहे. अभिनेत्री सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनूमध्ये रश्मिका मंदाना दिसणार आहे. याशिवाय रश्मिका गुड बाय, अॅनिमल यासह इतर सिनेमांमध्ये येता काळात दिसणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी