Shamita Shetty and Raqesh Bapat Breakup: शमिता शेट्टी आणि राकेश बापटच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. बिग बॉसच्या या जोडप्याचे ब्रेकअप झाले आहे. सर्व चर्चांना पूर्णविराम देत शमिता शेट्टीने सोशल मीडियावर ब्रेकअपची घोषणा केली आहे. राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांनी आपापल्या इन्स्टा स्टोरीमध्ये हे दोघे वेगळे झाल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे, शमिता आणि राकेश दीर्घकाळापासून वेगळे झाल्याचा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. मात्र, दोघांनीही यावर मौन बाळगले.
अधिक वाचा : उमेशच्या हत्येच्या आरोपात जेलमध्ये असलेल्या शाहरूखला चोपले
राकेश बापट आणि शमिता शेट्टीच्या ब्रेकअपची घोषणा करताना शमिता शेट्टीने आपल्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले की, 'मला वाटते की गोष्टी स्पष्ट करणे आवश्यक होते. राकेश आणि मी गेल्या काही काळापासून एकत्र नव्हतो. हे संगीत व्हिडिओ सर्व रसिक चाहत्यांसाठी आहेत ज्यांनी आम्हाला खूप प्रेम आणि पाठिंबा दिला आहे. आता वैयक्तिकरित्या आम्हा दोघांवर तुमचे प्रेम ठेवा. तुम्हा सर्वांना खूप सारे प्रेम आणि तुमच्या प्रेमाबद्दल आभार .' शमिता व्यतिरिक्त राकेश बापटने देखील सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी एक नोट लिहून ब्रेकअपची घोषणा केली आहे.
अधिक वाचा : चला हवा येऊ द्या मध्ये खूप मोठा बदल, श्रेयानंच दिली न्यूज
राकेश बापट यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की मी आणि शमिता आता एकत्र नाही. नशिबाने आपल्याला अनेक संकटे दाखवली आहेत. शारा परिवाराने आमच्यावर केलेल्या प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. मला माहित आहे की हे वाचून तुमचे हृदय तुटेल. मला आशा आहे की तुम्ही लोक आमच्यावर वैयक्तिकरित्या तुमच्या प्रेमाचा वर्षाव कराल. आम्हाला तुमच्या पाठिंब्याची नेहमीच गरज असेल. हा म्युझिक व्हिडिओ तुम्हा सर्वांना समर्पित आहे.
शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांची बिग बॉस ओटीटीमध्ये (Bigg Boss Ott) भेट झाली होती. दोघांनी या शोमध्ये पार्टनर म्हणून प्रवेश केला होता. काही काळानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर शमिता शेट्टीनेही बिग बॉस 15 मध्ये (Bigg Boss 15) भाग घेतला. त्याचवेळी राकेश बापटने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे राकेश या शोमधून बाहेर पडला होता. बिग बॉसनंतरही दोघींना अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिले गेले.